Thursday, May 9, 2024
Homeक्राईमजिनींग मॅनेजरला लुटणारे चोरटे पकडली, १० लाख जप्त; एलसीबी टिम'ची कारवाई

जिनींग मॅनेजरला लुटणारे चोरटे पकडली, १० लाख जप्त; एलसीबी टिम’ची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork (video)
अहमदनगर
: शेवगांव येथील जिनींग मॅनेजरला ३ महिन्यांपूर्वी लुटलेली १० लाख रुपयांची रक्कमेसह चोरटे पकडण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. चेतन प्रमोद तुजारे (वय१९, रा. वरुर, ता. शेवगांव), समाधान विठ्ठल तुजारे (वय २०, रा. वरुर, ता. शेवगांव) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार अंमलदार रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ मेघराज कोल्हे व भरत बुधवंत आदिंची टिमने‌ ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बॅंकेत देऊन ते १० लाख रुपये रोख रक्कम बॅगेत ठेवून दुचाकीवर जाताना पाठीमागून अनोळखी दोघे विनानंबर काळे रंगाचे दुचाकीवर येऊन दुचाकीला लाथ मारुन खाली पाडले‌ तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले, या विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (रा. शेवगांव) यांच्या फिर्यादीवरून शेवगांव पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२०६/२०२३ भादविक ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
घटना घडल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना एलसीबी टिम’ नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार एलसीबी टिम’ने वरुर (ता. शेवगांव) येथे जाऊन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना एलसीबी टिम’ला वर्णना प्रमाणे एकजण दिसून आला. एलसीबी टिम’ने संशयीतास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन प्रमोद तुजारे ( रा. वरुर, ता. शेवगांव) असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर दोन साथीदार समाधान तुजारे व अर्जुन तुजारे (दोन्ही रा. वरुर, ता. शेवगांव) अशांनी मिळून केल्याचे सांगितल्याने आरोपीचे साथीदारांचा शोध घेता आरोपी समाधान विठ्ठल तुजारे ( रा. वरुर, ता. शेवगांव) हा मिळून आला. फरार आरोपी अर्जुन ऊर्फ बाळु तुजारे (रा. वरुर, ता. शेवगांव हा फरार आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी चेतन प्रमोद तुजारे व 2) समाधान विठ्ठल तुजारे यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी, चोरी केलेली असा एकूण १० लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments