Monday, May 20, 2024
Homeक्राईमविरोध करताच गळा आवळून डोक्यात दगड घालून खून ,आग्रा, उत्तरप्रदेशातून दोघे आरोपी...

विरोध करताच गळा आवळून डोक्यात दगड घालून खून ,आग्रा, उत्तरप्रदेशातून दोघे आरोपी जेरबंद ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर:
येथील नागापूर येथे अनैसर्गिक संभोग करण्याचे उद्देशाने पाजली दारु तसेच विरोध करताच गळा आवळून व डोक्यात दगड घालून केला खून केल्याप्रकरणात आग्रा, उत्तरप्रदेश या ठिकाणीहून दोन आरोपींना पकडून आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात व अंमलदार रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, भिमराज खर्से, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, सागर ससाणे, आकाश काळे, प्रशांत राठोड व अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी भाऊ मयत संदीप ऊर्फ बाळू कमलाकर शेळके यास कोणीतरी अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणा करीता नायलॉन पट्टीने गळा आवळून व दगडाने डोके व चेहरा ठेचून जिवे ठार मारले, या संतोष कमलाकर शेळके (वय ४२, रा. बोल्हेगांव फाटा, नागापूर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं. १६९/२०२४ भादविक ३nike rouge jaune vert softball jerseys set tassen amazon diy cat home dornbracht armatur bad custom softball jerseys geaca jordan barbati ventaglio grande amazon dischi in vinile compro amazon violet shampoo before and after custom softball jerseys dischi in vinile compro amazon custom cycling jersey adidas taštička bila se zlatým meuble sous evier 100 cm brico depot०२,२०१ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल आहे.
घटना घडल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना ना उघड खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे आदेशित केले होते. या आदेशान्वये एलसीबी पोनि श्री.आहेर यांनी दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी एलसीबी टिम खुनाच्या गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन एलसीबी टिम’ला रवाना केले. एलसीबी टिम’ने लागलीच घटना ठिकाणी आजुबाजूस राहणा-या लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना मयत संदीप शेळके हा दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी विशाल जगताप व साहील पठाण (दोन्ही रा. एमआयडीसी) यांच्या सोबत देशी दारुचे दुकानात दारु पित बसलेले होते, अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. एलसीबी पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास दिली व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी व अंमलदार यांना सोबत घेऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत कळविले. स्थागुशा पथकाने लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेऊन विशाल जगताप व साहील पठाण (दोन्ही रा. एमआयडीसी) यांचा त्यांच्या राहत्या घरी व आजुबाजूस शोध घेता ते 2 दिवसांपासून घरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या विषयी पथकाचा संशय बळावला. एलसीबी टिम’ने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास करता संशयीत हे शहागंज मोहल्ला (जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश) येथे असल्याबाबत खात्री झाल्याने एलसीबी टिम’ने त्या ठिकाणी जाऊन संशयीतांचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीसांची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी, ता. नगर) व साहील शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापुर, एमआयडीसी, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्यावर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता संशयीतांनी गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी करता त्यांनी मयत संदीप शेळके यास अनैर्सिंक संभोग करण्याच्या उद्देशाने जास्त दारु पाजून, एमआयडीसी (ता. नगर) येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीचे पडके इमारतीत नेवून, मयताचे कपडे काढण्याचा जोरजबरदस्तीने प्रयत्न करताना मयताने विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळून व दगडाने डोके व चेहरा ठेचून जिवे ठार मारले, अशी हकिगत सांगितल्याने आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६९/२०२४ भादविक ३०२,२०१ या गुन्ह्याचे तपासकामी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments