Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedकोपरगांवात विक्रीस आणलेल्या गांज्यासह तिघे पकडले ; अ.नगर एलसीबी टिम' व कोपरगांव...

कोपरगांवात विक्रीस आणलेल्या गांज्यासह तिघे पकडले ; अ.नगर एलसीबी टिम’ व कोपरगांव पोलीसांची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: छत्तीसगड येथून कोपरगांव शहरामध्ये विक्री करीता आणलेला गांजा बाळगणा-या तिघांना मुद्देमालासह पकडण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ व कोपरगांव शहर पोलीसांची केली.
अजीम जाफर कुरेशी (वय ३२, रा. संजयनगर, कोपरगाव, जि. अहमदनगर मुळ रा.पी.एम.जी. कॉलनी, मानखुर्द, मुंबई), वाजीद कलीम कुरेशी (वय २२, रा. संजयनगर, कोपरगाव, जि. अहमदनगर), सुलतान रमजान अख्तर (वय २२, रा. संजयनगर, कोपरगाव, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, रविंद्र पांडे, पोना सचिन अडवल, संतोष खरे, चापोहेकॉ संभाजी कोतकर व कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोनि प्रदीप देशमुख, पोउपनि रोहिदास ठोंबरे, पोकाॅ गणेश काकडे, पोकाॅ राम खारतोडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


अहमदनगर एलसीबी व कोपरगाव शहर पोलिस ठाणे विशेष टिम शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणा-यांची माहिती काढत असतांना पोउपनि तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत आजीम कुरेशी (रा. कोपरगाव) व त्याचे दोन साथीदार असे काळया रंगाच्या ड्रिम युगा बिना नंबरच्या दुचाकीवरून ट्रिपल सिट साई कॉर्नर, कोपरगाव येथे सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस टिम यांनी तात्काळ कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोनि प्रदीप देशमुख यांना माहिती सांगून छाप्याचे नियोजन केले.
माहितीनुसार कोपरगांव शहर पोलिस व एलसीबी टिम’ने तातडीने कोपरगांव शहर पोलीस ठाणे हद्दीमधील साई कॉर्नर (कोपरगांव) या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले. या दरम्यान माहितीनुसार दुचाकीवर तिघे येतांना दिसले. पोलीस पथकाने दुचाकीवर येणाऱ्यांना इशारा केला असता ते त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावर पोलिस टिमने योग्य त्या बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अजीम जाफर कुरेशी, वाजीद कलीम कुरेशी, सुलतान रमजान अख्तर असे असल्याचे सांगितले.
या तिघांची पंचासमक्ष झडती घेता त्यांचे कब्जामध्ये १० किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा, तसेच ३ मोबाईल, एक विनानंबरची हाँडा कंपनीची ड्रिम युगा दुचाकी असा एकूण ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो हस्तगत करण्यात आला. पकडण्यात आलेल्यांकडे अंमली पदार्थ गांजा कोठून आणला, याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी अंमली पदार्थ गांजा हा तौफीक तांबोळी (पूर्ण नाव माहित नाही) इदगाह फाटा, लाकेनगर, रायपूर, छत्तीसगड याच्याकडून आणला असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांच्याविरुद्ध एलसीबीचे पोहेकॉ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०३ २०२३ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) सह २० (क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोनि प्रदिप देशमुख हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments