Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाचंद्रकला ढाकणे यांचे निधन

चंद्रकला ढाकणे यांचे निधन

Nagar Reporter
Online news Natwork
हातगाव :
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील चंद्रकला कारभारी ढाकणे यांचे नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. बालमटाकळी येथील भगवान विद्यालयाचे माजी प्राचार्य स्व. कारभारी ढाकणे यांच्या त्या पत्नी होत्या. तर भारतीय जनता पक्षाचे अपंग सेलचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे व पिंप्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण ढाकणे यांच्या त्या मातोश्री होत्या. तसेच राष्ट्रीय वंजारी, ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दादासाहेब ढाकणे यांच्या त्या चुलती होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments