Friday, May 10, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त रामगड ,चिंचपूर पांगुळ येथे कीर्तन महोत्सव.

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त रामगड ,चिंचपूर पांगुळ येथे कीर्तन महोत्सव.

Nagar Reporter
Online news Natwork सोमराज बडे

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील दुर्गम भागात अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण अभियान संपन्न झाले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या समितीतर्फे घरोघरी जाऊन प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियान १ ते १५ जानेवारी कालावधीत गृहसंपर्क अभियान राबविण्यात आले आहे.
प्रत्येक गावातील प्रत्येक घरातही दिवाळी प्रमाणे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक घरी पूजा करणे ,दीप प्रज्वलन करणे, राम नामाचे जप करणे, फटाके फोडने, गोडधोड करणे, रांगोळ्या काढणे, घरावर वर भगवे झेंडे फडकवणे.परिसरातील सर्वच गावांतील मंदिरांत भजन,कीर्तन, रामनाम जप, आरती, रांगोळी, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.श्री रामगड संस्थान ,रामगड चिंचपुर पांगुळ येथे रविवार दि.२१ रोजी रात्री भजन, व जागर होणार आहे.तसेच मंदिरावर आकर्षक विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे.

तर सोमवार दि.२२ जानेवारी रोजी पहाटे काकडा, सकाळी ९ते१० भव्य शोभा यात्रा व कलश मिरवणूक काढण्यात येणार असून.१०ते १२.३० वा.हभप.विठ्ठल महाराज जोग महाराज संस्थान आळंदीकर यांचे प्राणप्रतिष्ठा निमित्त जाहीर हरिकीर्तन होणार आहे.१२ते ३० दरम्यान अयोध्या येथील प्रभूश्रीरामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्त दरम्यान पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे .यामध्ये गावातील प्रत्येक घरातून आणलेले लाडू यांचा प्रसाद दिला जाणार आहे..
तर सायंकाळी ५ते ६ हरिपाठ ,रात्री भजन,जागर,पहाटे काकडा तर दि २३ रोजी सायं ५ ते७ हरिपाठ ,रात्री ७ते९ हभप.चंद्रकात महाराज खळेकर (राहुरी) यांचे हरिकीर्तन होणार आहे. ९वा. महाप्रसाद होणार असून.रात्री भजन,जागर होऊन दि.२४ रोजी सकाळी ९ते१० मंदिर प्रदिक्षणा होऊन सकाळी १०ते १२ हभप .विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड कर,यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुसपवृष्टी करण्यात येईल. व त्यानंतर महाप्रसाद पंगत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
या सर्व कार्यक्रमाचा सर्व रामभक्त व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांवकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान वरील सर्व कार्यक्रम श्री क्षेत्र रामगड या ठिकाणी पार पडणार आहेत.

हभप. वामनदेव महाराज यांनी या राम मंदिराची उभारणी केली होती.
मुख्य मंदिरात श्रीराम ,माता सीता,व लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती असून ,शेजारी पुरातन विठ्ठल रुख्मिणी च्या मूर्ती,तसेच अनेक संतांच्या आकर्षक मूर्ती आहेत. वै. वामनदेव महाराज यांनी स्वतःच्या हातानी घडवलेली हनुमानाची मूर्ती समोर आहे.यानिमित्ताने मंदिराची आकर्षक रंग-रंगोटी करण्यात आली आहे.
पंचक्रोशीतील ढाकनवाडी (वडगांव) ,येथे गेल्या माहिनाभरापासून रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.तर जोगेवाडी,मानेवाडी,वडगांव,येथे दि.२२रोजी १०ते १२ हरिकीर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments