Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने, पाथर्डी तालुक्यात कला पथकाद्वारे...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने, पाथर्डी तालुक्यात कला पथकाद्वारे जनजागृती…

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे

पाथर्डी :. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण व जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनेची माहिती श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या कलापथकाद्वारे तालुक्यात तिसगाव, जवखेड खा. निवडुंगे, हातराळ, माणिकदौडी, पागोरी पिंपळगाव, सुसरे, मोहोजदेवडे, चिंचपूर , या दहा गावात वाडी वस्ती व चौकात जाऊन कलापथकाच्या माध्यमातून गाण्याद्वारे प्रबोधन करण्यात आले आहे.

चिंचपूर इजदे या गावात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदरील कार्यक्रम गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच सौ पुष्पा मिसाळ, विजय मिसाळ, बाबासाहेब खंडागळे, बळीराम शिंदे, अजिनाथ शिंदे, बाळासाहेब वैरागर, वैशाली खंडागळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती पर शासकीय योजनांची माहिती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना एकत्र जमून त्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप इंडिया, अनुसूचित जाती उपायोजना, भारत सरकार शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृह, आदी विषयावर पथनाट्य स्वरूपात गीता द्वारे तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती देण्यात आली.

संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. जनार्धन बोडखे, सुरेखा बोडखे व त्यांच्या सहकार्याने मागासवर्गीय वस्तीत जाऊन श्रोत्यांना प्रबोधनात्मक संदेश देत मंत्रमुग्ध केले. त्यांना साथसंगत हार्मोनियम वर चेतन सोनवणे, सोमनाथ घोरपडे, ढोलकी वर बंटी वडागळे, बंडू कराड, चैतन्य सांगळे यांनी साथ दिली. जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावात आमच्या सादरीकरणास, कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काही नागरिकांनी आमच्या कलेला बक्षीस दिले. तर काही ठिकाणी सादरीकरणासाठी आमचा सन्मान करण्यात आला. यावेळी कला पथकाद्वारे केलेल्या समाजप्रबोधनातून आम्हाला चांगलीच उपयुक्त माहिती मिळाली असल्याचे अनेकांनी सांगितले.

प्रथमच जिओ टॅगिंग चा उपयोग…
जिल्हाभरात झालेल्या या कला पथकाच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापन व रिपोर्टिंग साठी जिथे कार्यक्रम सादर केला. तेथील छायाचित्र वेळोवेळी अपडेट्स करण्याच्या सूचना सर्व कला पथकांना देण्यात आल्या होत्या. त्यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक कार्यक्रमाचे रिपोर्टिंग जिओ टॅगिंगसह असलेल्या छायाचित्र व व्हिडिओद्वारे करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments