Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हाशेअर्स ब्रोकर निलेश लोढा यांच्या २०२४ वर्षाच्या दिनदर्शिकेचे नववधू वराच्या हस्ते प्रकाशन.

शेअर्स ब्रोकर निलेश लोढा यांच्या २०२४ वर्षाच्या दिनदर्शिकेचे नववधू वराच्या हस्ते प्रकाशन.

शेअर ब्रोकर निलेश लोढा यांच्या २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नववधू-वर भावना राजेंद्र लोढा व कुणाल श्रेणिक शहा समवेत भाजपाचे ज्येष्ठनेते वसंत लोढा व निलेश लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे

:-नगर-शहरातील शेअर ब्रोकर निलेश लोढा यांच्या २०२४या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भावना राजेंद्र लोढा आणि कुणाल श्रेणिक शहा या नववधू-वराच्या हस्ते नंदनवन लॉन्स मधील दिमागदार लग्न सोहळ्यात संपन्न झाले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पंडित दीनदयाल पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतजी लोढा,शिवसेनेचे नेते संभाजी कदम,बाळासाहेब बोराटे, नगरसेवक अजय चितळे,संतोष गेनप्पा,गणेश कवडे,रा.स्व.संघाचे प्रशांत सहस्त्रबुद्धे राहुल पुरोहित, वर्धमान पितळे,बजरंग दलाचे कुणाल भंडारी,अनुराग आगरकर,अंतू वारूळे,केवळचंद लोढा,विनोद लोढा, राजेंद्र लोढा,राहुल लोढा चेतन लोढा, गोविंदा डागा,अनय घोगरे निलेश दुस्सा,किरण घनवट तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.
पंचांगावर आधारित असलेली मराठी दिनदर्शिकेचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन्यात केलेले आहे.यामध्ये मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती सविस्तर दिलेली आहे.लोढा यांच्या दिनदर्शिका प्रकाशनाचे हे पाचवे वर्ष आहे.
शेअर्स ब्रोकर निलेश लोढा यांच्या फर्मच्या पुणे,संभाजीनगर व शेवगाव या तीन ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.नगरमध्ये गेल्या सात वर्षांपासून एक चांगली सेवा गुंतवणूकदारांना दिली जात आहे. त्यांचे शिक्षण एमबीए फायनान्स झाले असून ते पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संचालक आहेत.

नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचे योग्य ते मार्गदर्शन लाभत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यारुपाने देशाला एक चांगले नेतृत्व लाभल्याने जगात भारताची प्रतिमा उजळली आहे.परिणामी भारतीय शेअर्स बाजारात चांगला परिणाम दिसू लागला आहे.शेअर बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे.हा आलेख असाच वाढत राहील असे यावेळी बोलतांना लोढा म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments