Monday, May 20, 2024
Homeक्राईमनगर तालुका हद्दीत २८ लाख ७० हजारांचा गुटखा पकडला ; नगर एलसीबी...

नगर तालुका हद्दीत २८ लाख ७० हजारांचा गुटखा पकडला ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर (Ahemdnagar) –
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला हिरा गुटखा व पानमसाला विक्रीसाठी, वाहतूक करणा-या सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबीने केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ सचिन आडबल, पोना संतोष लोढे, पोना विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव व रोहित मिसाळ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ अवैध धंद्यांची माहिती घेताना एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने लागलीच पंचांना सोबत घेऊन नगर सोलापुर रोडने, रुईछत्तीशी गावचे शिवारा १० वाजण्याच्या सुमारास सापळ लावला. या दरम्यान काही वेळेने वाहने येताना दिसल्याने संशयीत वाहनांना बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करुन गाड्या थांबवून गाडीतील इसमांना पोलिस असल्याचे सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सईद ऊर्फ रिजवान अर्शद दिवाण (वय 37, रा. रविवार पेठ, कराड, जि. सातारा), इसरार अहमद सलाउद्दीन शेख (वय 28, रा. इसकपुर, ता. माटीगंज, जि. आझमगड, राज्य उत्तर प्रदेश), जुबेर सिंकदर डांगे (वय 28, रा. कोले, ता. कराड, जि. सातारा) व साजीद ऊर्फ शाहरुख अर्शद दिवाण (वय 37, रा. रविवार पेठ, मोमीन मोहल्ला, ता. कराड, जि. सातारा) असे असल्याचे सांगितले.
संशयीतांचे ताब्यातील वाहनांची पंचा समक्ष झडती घेता त्याामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेली हिरा गुटखा व पानमसाला मिळुन आल्याने त्याबाबत अधिक विचारपुस करता आरोपींनी सदर माल हा महंमद सोहेल निपाणीकर (फरार) व नदीम गुलखान पठाण दोन्ही रा. बेळगांव, कर्नाटक (फरार) यांनी नाशिक येथे विक्री करीता घेवुन जाणे करीता दिला असल्याची माहिती दिल्याने आरोपींना विविध प्रकारची हिरा गुटखा व पानमसाला, 2 अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व 1 फियाट कार असा एकुण 28,70,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. 12/24 भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments