Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकमोहटादेवी येथे राम मंदिर उदघाटन निमंत्रण अक्षता कलशचे वितरण....

मोहटादेवी येथे राम मंदिर उदघाटन निमंत्रण अक्षता कलशचे वितरण….

यावेळी मोहटा,करोडी,टाकळी मानूर,अंबिका नगर, चिंचपूर इजदे, पिपळगाव तप्पा, चिंचपुर पांगुळ, जोगेवाडी, ढाकनवाडी ,वडगांव ,मानेवाडी, जांभळी, कारेगाव, कुत्तरवाडी, अकोला ,भिलवडे, रुपनरवाडी, हाकेवाडी,काळेवाडी ,तीनखडी, येळी, पालवेवाडी, धायतडकवाडी,आदी.सर्व गावांना आज ता.(२६)रोजी श्री क्षेत्र मोहटादेवी येथील भक्त निवास येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात तारकेश्वर गडाचे महंत हभप.श्री आदिनाथ महाराज शास्त्री यांचे हस्ते विधिवत पूजा करून सिद्ध केलेल्या अक्षतांचा कलश वितरण कार्यक्रम संपन्न झाला..

ह.भ.प.आदिनाथ महाराज यांनी या वेळी बोलतांना सांगितले की, शेकडो वर्षे ज्याची प्रतीक्षा रामभक्तांना करावी लागली तो दिवस आता समीप आला आहे. भारताची पुनः प्रतिष्ठापना होत आहे. आपले परंमभाग्य आहे की आपल्या डोळ्याने आपण हे अनेक पिढ्यानी पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना पहात आहोत. भव्यमंदिर उदघाटन निमंत्रणाच्या अक्षता वितरित करण्याचे भाग्य तुम्हा रामभक्तांना मिळाले आहे, यासारखे पुण्याचे काम आणखी दुसरे काय असू शकते असे ते म्हणाले.
या प्रसंगी कारसेवक म्हणून तत्कालीन वेळेस गेलेले अशोकराव चोरमले यांनी आपले कारसेवे दरम्यान आलेले अनुभव ,कारसेवे नंतरची परिस्तिथी यावर आपले मनोगत व्यक्त केले. तर अमितजी राऊत यांनी अभियानाचा उद्देश तथा संपूर्ण अभियाना संबंधित स्वयंसेवकाना मार्गदर्शन करत पवित्र अक्षता ,प्रतिमा प्रत्येक घरी पोहोच होईल याची काळजी घ्यावी असे सांगितले.
तालुका संघचालक अरविदजी परगावकर यांनी आदिनाथ शास्त्री यांना उदघाटन निमंत्रण आल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी शैलेश शिरसाट यांनी राम मंदिर लढ्याचा संपूर्ण इतिहास सविस्तर वर्णन करत उलगडून सांगितला.

जिल्ह्यातील सर्व उपखंड नगर स्थानांवर अक्षता कलश पूजनाचा कार्यकम संपन्न होत आहे. उपखंड, नगर स्थानावरील पूजन कार्यकम संपन्न झाल्यानंतर ग्राम , वस्तीमध्ये अक्षता कलश पूजन कार्यकम होणार आहेत; त्यानंतर अक्षता वितरण करून आमंत्रण देण्याचा कार्यक्रम देशभर १ ते १५ जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन कार्यकर्ते अक्षता व श्रीराम मंदिराचा फोटो भेट म्हणून देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments