Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हाभिंगारवासियांना नवीन वर्षात कमी दराने पिण्याचे पाणी मिळणार !

भिंगारवासियांना नवीन वर्षात कमी दराने पिण्याचे पाणी मिळणार !

👉अहमदनगर मनपाकडून १२ रु. क्युबिक दराने भिंगारकरांना पिण्याचे पाणी मिळणार
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर –
भिंगारच्या नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती, परंतु आत्ताच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीओ यांच्या मोठ्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीमुळे भिंगारकरांना मुबलक व कमी दराने अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून अमृतपाणी योजनेतून पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग नवीन वर्षात मोकळा झाला आहे. यामुळे भिंगारकरांच्या खिशावराचा आर्थिक ताण कमी झाला आहे‌.

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला म्हणजेच भिंगारवासियांना आजरोजी पर्यंत ३० रुपये क्युबिक मीटर या महागड्या दराने पिण्यासाठीचे पाणी विकत घ्यावे लागत होते. यामुळे बोर्ड प्रशासनाला महिन्याकाठी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपयांची मोठी रक्कम मोजावी लागत होती. पण या भिंगारवासियांच्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण महागड्या पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून ती सोडवण्यासाठी प्रामुख्याने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष तथा ब्रिगेडियर रसेल डिसूजा, उपाध्यक्ष वसंत राठोड व बोर्डाचे सीओ विक्रांत मोरे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गंभीर नागरी समस्या मार्गी लागली आहे. यात खा. सुजय विखे पा. यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच भिंगारवासियांना आता नवीन वर्षात १२ रुपये क्युबिक मीटरने दराने पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची यामुळे मोठी आर्थिक समस्या सुटण्यास मोठी मदतच होणार आहे. यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष व सीओ, उपाध्यक्ष यांच्या पाठपुरालाच मोठे यश आले आहे.
भिंगारकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागणाऱ्या रकमेतून कमी म्हणजेच १२ रुपये क्युबिक मीटर दराने महापालिकेकडून पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. ही बाब सर्वच भिंगारकरांच्या दृष्टीने आनंदाची आहे, पण मोठी जमेची बाजू आहे. भिंगार शहराच्या अश्या अनेक सामाजिक व विकासात्मक दृष्टीने भिंगारकरांसाठी समस्या सुटणे महत्वाचे आहे. यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डतील उपाध्यक्ष हा प्रशासनाचा अभ्यास असणारा आणि प्रशासन हे इंग्रजी भाषेत असल्याने त्यात तो जाणकार असणे आवश्यक आहे. यामुळेच भिंगारवासियांच्या बोर्ड प्रशासनस्तरावर अनेक नागरी समस्या सुटण्यास मदत होत असते, ही बाब आत्ताच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या घडामोडींमुळे भिंगारकरांच्या लक्षात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments