Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हा'गुन्हेगारी हटाव, पाथर्डी शहर बचाव' यासाठी सोमवारपासून उपोषण

‘गुन्हेगारी हटाव, पाथर्डी शहर बचाव’ यासाठी सोमवारपासून उपोषण

Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी –
शहरात वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी व शहरातील भयभीत जनतेला वा-यावर सोडणा-या प्रशासन व लोकप्रतीनीधीचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे हे सोमवार( दि. 2 जानेवारी 2023) पासून नाईकचौक पाथर्डी येथे लाक्षणिक उपोषण करणार आहे.‌ याबाबतचे जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शहरात व तालुक्यात नेहमीच होणा-या चो-या,तसेच महिलांच्या अंगावरिल दागिणे पळविणे,मोबाइल चोरिला जाणे,खिसे कापणे, फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्या चोरीला जाणे,चेहर्यावर केमिकल स्प्रे मारून गुंगविणे व लुटणे या सारख्या भयानक गुन्हेगारीने पाथर्डी शहरात थरार निर्माण केला आहे. त्याविरोधात व शहरातील भयभीत जनतेला वा-यावर सोडणा-या सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांचे सोमवार (दि.2 जानेवारि 2023) नाईक चौक पाथर्डी येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
या उपोषणास शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे ही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments