Monday, May 20, 2024
Homeक्राईमघरात घुसून चाकू दाखवून दरोडा टाकणा-यांना पकडले ; एलसीबी टिम'ची कामगिरी

घरात घुसून चाकू दाखवून दरोडा टाकणा-यांना पकडले ; एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर –
शहरातील कल्याणरोड आणि संगमनेर तालुक्यातील पावबाकी, सुकेवाडी येथे घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणा-या दोघा सराईत चोरट्यांना पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे.
रावन ऊर्फ छनक नादर चव्हण (वय २३), फिलीप नादर चव्हाण (वय २३ दोघे रा. सालेवडगांवरोड, चिचोंडी पाटील, ता. नगर, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, नगर ग्रामीण डिवायएसपी
अजित पाटील, शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकिर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरदंले, सचिन आडबल, भिमराज खर्से, दिपक शिंदे, पोकॉ जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोकॉ सारीका दरेकर, चापोहेकॉ बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व भरत बुधवंत आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1053/2022 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनास्थळी एसपी राकेश ओला यांनी भेट देवून, निरीक्षण करुन एलसीबी पोनि श्री. कटके यांना एलसीबीची स्वतंत्र पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये पोनि श्री.कटके यांनी एलसीबीची विशेष टिम तयार करून गुन्हा उघडकिस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. एलसीबी टिम’ने नगर तालुका परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री. कटके यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार त्यांनी ‘एलसीबी टिम’ला सालेवडगांवरोड (ता. नगर) येथे रवाना केले. विशेष टिममधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन सालेवडगांव येथे जाऊन माळरानाची पाहाणी करता त्यांना ६-७ जण एका लिंबाचे झाडाखाली बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते माळरानावर पळू लागले. एलसीबी टिम’ने पाठलाग करुन दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांचे इतर साथीदार डोंगरातील झाडा झुडपांचा सहारा घेऊन पळून गेले, त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रावन ऊर्फ छनक नादर चव्हण, फिलीप नादर चव्हाण‌( दोघे रा. सालेवडगांव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर, जिल्हा अहमदनगर) असे सांगितले. त्यांचेकडे घडलेल्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले, यानंतर दोघांना पोलिस टाक्या दाखविताच त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली, त्या दोघांना एलसीबी टिम’ने ताब्यात घेतले.
दोघांना विश्वासात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे दरोडा चोरी केली आहे. याबाबत विचारपुस केली असता आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी (ता. संगमनेर) येथे घरात प्रवेश करुन चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची कबुली दिल्याने, अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोडा चोरीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने दोघांना कोतवाली पोलीस ठाण्यात येथे हजर केले. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments