Thursday, May 9, 2024
Homeराजकीयप्रताप ढाकणे यांचे भीक मांगो आंदोलन. पालिकेतील खुर्च्यांची केली मोडतोड...!

प्रताप ढाकणे यांचे भीक मांगो आंदोलन. पालिकेतील खुर्च्यांची केली मोडतोड…!

पाथर्डी शहरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात आजाराने डुकरे मरून पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.,रस्त्यावरील पथदिवे कायमच बंद असतात त्यामुळे भुरट्या चोराचे यामुळे फावते., आरोग्य विभागाचा ठेकेदार तुमचे ऐकत नाहीत, अधिकारी ,कर्मचारी वेळेवर कार्यालयात सापडत नाहीत, अंतर्गत रस्त्याचे काम बंद पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली. ठेकेदारांमध्ये टक्केवारीवरून भांडणे होऊन गुंडांकडून धमकी देऊन काम बंद पाडले जाते. शहरातील नवी पेठेतील काम बंद पडलेल्या रस्त्याची पाहणी करत ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, शहराध्यक्ष योगेश रासने, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिर शेख,देवा पवार, गोरक्ष ढाकणे, सुनिल पाखरे, सोमनाथ बोरुडे, अतिष नि-हाळी, उद्धव दुसंग, एम.पी.आव्हाड, बाळासाहेब घुगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चा घेऊन पालिका कार्यालयात गेले. यावेळी उपस्थित कार्यालय अधीक्षक अमोल मदने, पालिका अभियंता विशाल मडवाई व अन्य कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. एकही कर्मचारी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जबाबदारीने न देता केवळ वेळ मारून नेत बोलत आहे असे लक्षात येताच ,ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना पुन्हां फोन केला परंतु त्यानी फोन घेतला नाही. मात्र पुन्हा कॉल केल्यावर मुख्याधिकारी इतर कोणाशी बोलत होते त्यामुळे फोन एंगेज लागला. यावेळी आपला फोन टाळला जातोय असे लक्षात येताच ढाकणे व त्यांचे समर्थक संतप्त झाले व घोषणाबाजी करू लागले. 

यावेळी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची गॅलरीमध्ये खेचून आणत कार्यकर्त्यांनी खुर्ची खाली फेकून देत निषेध नोंदवला. कार्यकर्ते पुन्हा दालनात येत अन्य खुर्च्याची देखील मोडतोड केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम सुरू न केल्यास पुन्हा वेगळा प्रकारे पवित्रा घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे सायंकाळी पाच पूर्वी काम सुरू करतो असे बांधकाम अभियंता मडवाई यांनी सांगितले. यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले की, आगामी काळात सर्वच विभागातील अनागोंदी कारभाराची पोलखोल करत जाब विचारला जाईल. जनता आता असे गैरप्रकार सहन करणार नाही. या दरम्यान सगळा वृतांत समजल्यानंतर मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी ढाकणे यांना स्वतः भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. आणि उद्या सकाळी दहा वाजता कोणत्याही परिस्थितीत आपण काम सुरु करतो असे आश्वासन दिले ढाकणे यांनी ते मान्य केले. यावेळी लवकरच तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारा बाबत अचानक अशाच प्रकारचे आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दिवसभर याचीच चर्चा तालुक्यात रंगली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments