Monday, May 20, 2024
Homeक्राईमनागरदेवळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

नागरदेवळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: अहमदनगर शहरानजिकच्या नागरदेवळे या ठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२ जानेवारी २०२४) सायंकाळी घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरदेवळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे घटनेनंतर नागरदेवळे परिसरावर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. या घटनेबाबत शबाना लियाकत शेख यांच्या फिर्यादीवरून अभिजीत धाडगे, पुष्कर शेलार, उदय शेलार व इतर ७ ते ८ अनोळखी जणांवर भादविक १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ४५२, ३२३, ५०४,५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments