Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedपिंपळगाव तप्पा ते चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी घाट रस्त्याचे काम निकृष्ट! बांधकाम विभागाचे...

पिंपळगाव तप्पा ते चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी घाट रस्त्याचे काम निकृष्ट! बांधकाम विभागाचे याकडे लक्ष आहे का?

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव तप्पा पासून ते चिंचपूर पांगुळ,जोगेवाडी ते बीड जिल्हा हद्दीस जोडणा-या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सुमारे पाच ते सहा महिन्याआधी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. घाट कटाई चे काम झाले आहे.ते सुद्धा म्हणावे असे काही फारसे व्यवस्तीत झालेले नाही. पाथर्डी तालुक्याला डोगरपट्यातील गांवे जोडणारा म्हणून या रस्त्याला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तसेच शेजारील बीड जिल्ह्यातील शिरूर,पाटोदा,आष्टी,या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेत मालाची ने आन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग आहे.

त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुले तसेच या परिसरातील गावांना तालुक्यातून येणारा शिक्षक वर्ग,व इतर नोकरदार यांना हा रस्ता महत्वाचा आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे. सदर मार्गाचे रुंदीकरण ,मजबुतीकरण करून खडी व डांबरीकरण चे काम सुरू केले आहे,मात्र रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी हि सुद्धा निकृष्ट दर्जाची असून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या भरावाची दबई देखील झाली नाही. शिवाय अनेक ठिकाणी पुरेश्या प्रमाणात रुंदीकरण हि झालेले नाही. घाटात धोकादायक ठरू शकणारे वळण कमी करण्यात आलेले नाही.त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डांबर कमी प्रमाणात वापरल्याने रस्ता उखडायला सुरूवात झालेली आहे.चिंचपूर, वडगांव, जोगेवाडी,मानेवाडी व परिसर येथील रहिवाशांची याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चिंचपुर इजदे पासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर असलेला हा रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती.यासाठी परिसरातील नागरिकांनी यासाठी प्रयत्न केले होते. तश्या स्वरूपाच्या अनेक बातम्या आम्ही प्रसारित केल्या होत्या त्याचीच दखल घेऊन या कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे एक वर्षांआधी पिपळगाव तप्पा पर्यतच्या कामाला सुरूवात देखील झाली होती.

त्यापैकी अर्धे काम पूर्ण झाले आहे.अर्धे काम झाल्यानंतर उर्वरित सुमारे नऊ ते दहा किमीच्या कामाला सहा महिन्याआधी सुरूवात झाली. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून डांबरीकरणाच्या आधीच रस्ता उखडून गिट्टी वर येत आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या भराची दबाई योग्य प्रकारे झाली नाही, ग्राउटिंगला संमप्रमान असलेली पक्की मजबूत खडी न टाकता निकृष्ट दर्जाचे खरीप,बारीक आकाराची खडी टाकून हे काम सुरू आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी अत्यल्प प्रमाणात डांबर टाकण्यात येत असल्यानेच सदर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा तयार होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.याबत अनेक ग्रामस्थ तक्रार करण्याच्या तयारीत असून याकडे बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे व रस्त्याचे काम ठेकेदाराकडून चांगल्या प्रकारे करून घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

👆(फोटो-कमी डांबर वापर केला असल्याने उचकटलेली खडी.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments