Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकशारदीय नवरात्र उत्सवात आईमोहटादेवी चरणी भक्तांनी केले कोटीचे दान.

शारदीय नवरात्र उत्सवात आईमोहटादेवी चरणी भक्तांनी केले कोटीचे दान.

शारदीय नवरात्र उत्सवात आईमोहटादेवी चरणी भक्तांनी केले सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपयांचे दान प्राप्त.

सोमराज बडे,पाथर्डी: राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविकांनी देवी दर्शन घेऊन सुमारे १ कोटी ६५ लाखाचे दान देवीचरणी अर्पण केले आहे.

 देवस्थानच्या दानपात्राची  मोजदाद नुकतीच अहमदनगर येथील धर्मादाय उप आयुक्त यांचे प्रतिनिधी उमाकांत फड , देवस्थान विश्वस्त , पाथर्डी येथील सराफ मे. काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलीस व देवस्थान सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही निगराणीमध्ये संपन्न झाले.

       यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी ०१ लाख २  हजार  मात्र तसेच सोने २६७ ग्रम मूल्यांकन रूपये १६ लाख ३१  हजार , चांदी वस्तू ९  किलो १२५  ग्रम मूल्यांकन  रुपये ६  लाख ८४  हजार ६००  मात्र, पावत्यांव्दारे रु. ३३ लाख ७६ हजार ७६० मात्र तसेच  कावड, पालखी एकत्रित  रुपये २ लाख  २० हजार  ६२५ मात्र, ऑनलाईन च्या माध्यमातून ५ लाख १२ हजार  ४०० रुपये. अशा विविध स्वरुपात तब्बल  १ कोटी  ६५  लाखाचे रुपये देणगी देवस्थानास प्राप्त झाली आहे. वेळेअभावी देणगीची मोजणी अद्याप पूर्ण होऊ शकली  नाही.
पार्कींग ची व्यवस्था खासगी असल्याने भक्तांना अनेक अडचणीना सामना करावा लागला. भाविकांना दोन तीन किलोमीटर अंतरावर वाहने उभी करून दर्शनासाठी जावे लागत असल्याने उन्हाचा त्रास सहन करावा लागला.त्यामुळे काही भक्तांनी दुरूनच कळस दर्शन घेऊन समाधान मानले.याचाच परिणाम थेट दानपेटीवर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अपुऱ्या सोयी सुविधा, पार्कींग साठी होत असलेली अरेरावी,तसेच मनभाव दाम वसूल करण्यात येत असल्यामुळेही भाविकातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मागील वर्षी च्या तुलनेत या वर्षी नवरात्र उत्सव मध्ये गर्दी झाली नाही. त्यामुळे देवीची देणगी यावर्षी कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
         शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वी होणेकरिता अहमदनगर चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश-१ सुनील गोसावी , पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, व सर्व विश्वस्त मंडळ विशेष परिश्रम घेतले.


          देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत पार पडण्याकरिता विविध विभागांनी,तसेच संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी,भाविक आणि मोहटा ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले आहेत.  अशी माहिती देवस्थानचे  मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments