Thursday, May 9, 2024
Homeक्राईमचोरटा पकडला,३ दुचाकी जप्त ; शेवगाव पोलिसांची कारवाई

चोरटा पकडला,३ दुचाकी जप्त ; शेवगाव पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
शेवगाव :
संशयित आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करुन चोरटा पोलिसांनी ताब्यात घेतला. शेवगाव पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि दिगंबर भदाणे, पोहेकाँ किशोर काळे, पोना उमेश गायकवाड, पोना संदिप आव्हाड, पोकाॅ शाम गुंजाळ, पोकाॅ बप्पासाहेब धाकतोडे, पोकाॅ कृष्णा मोरे, पोकाॅ संपत खेडकर, पोकाॅ संतोष वाघ यांनी ही कारवाई केली आहे.

पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील चैतन्य कानिफनाथ मढी यात्रेतून दुचाकी वाहनाची चोरी करुन ती दुचाकी वाहने शहरटाकळी (ता. शेवगाव) याठिकाणी आणल्याबाबत माहीती मिळाली होती. माहीतीच्या अनुषंगाने तात्काळ पोनि दिगंबर भदाणे यांच्या सूचनेनुसार पोलीस टिम रवाना होऊन खात्री केली असता शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील शहरटाकळी येथील राहणारा वैभव लक्ष्मण हिवाळे (वय २२ वर्षे रा. शहरटाकळी ता. शेवगाव) याने चोरलेल्या दुचाकीबाबत विचारपुस केली असता त्याने त्याच्या राहत्या घरी असलेल्या तीन दुचाकी तुम्ही माझ्यासोबत चला त्या मी चोरी केलेल्या दुचाकी देतो. असे सांगितले दि५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास ठिकाणी गेलो असता त्याठिकाणी २ हिरो स्प्लेंडर व १ एच एफ डिलक्स अशा तीन दुचाकी त्या ठिकाणी दिसल्या. आम्ही त्या दुचाकी व आरोपी यास शेवगाव पोलीस ठाणे याठिकाणी आलो. आरोपीकडे विचारपुस केली की तू या दुचाकी कोठुन आणल्या आहेत. तेव्हा त्याने सांगितले की, चैतन्य कानिफनाथ मढी यात्रा व सोनई याठिकाणावरुन या दुचाकी चोरुन आणल्या आहेत.
त्यानंतर आम्ही पाथर्डी व सोनई पोलीस ठाणे यांच्याकडे संपर्क केला असता त्या दुचाकी चोरी झाल्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ३३८/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाने व सोनई पोलीस ठाणे गु.रजि.नं.१४९/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही तात्काळ त्यांना बोलावून आरोपी वैभव लक्ष्मण हिवाळे (वय २२ वर्षे रा. शहरटाकळी ता. शेवगाव) व दुचाकी त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास पाथर्डी व सोनई पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments