Thursday, May 2, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्री क्षेत्र रामगड चिंचपूर पांगुळ, येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी...!

श्री क्षेत्र रामगड चिंचपूर पांगुळ, येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी…!

चिंचपूर पांगुळ ,रामगड येथे भक्तिमय वातावरणात रामजन्मोत्सव साजरा.

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी:
जय श्रीराम’, ‘जय जय श्रीराम’,’सियावर रामचंद्र भगवान की जय…अशा गजरात चिंचपुर पांगुळ(ता.पाथर्डी)येथील रामगड मंदिरात बुधवारी श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी चिंचपूर पांगुळ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान गेली सात दिवस सकाळी ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी गाथा भजन,सायंकाळी हरिपाठ तर दररोज रात्री सात ते नऊ प्रसिद्ध किर्तनकारांचे हरीकिर्तन,व नंतर प्रसाद त्यानंतर भजन,जागर,तर पहाटे काकडा-आरती अश्या माध्यमातून मंदिरांमध्ये दिवस-रात्र प्रभू श्री रामाचा गजर करण्यात येत होता. येथील रामगड मंदिरात वै.ह.भ.प.वामनदेव महाराज व गावकऱ्यांनी सुरु केलेली गेली ४२ वर्षांपासूनची रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटा-माटात साजरा करण्याची परंपरा आहे. 

या परंपरेला साजेसा सोहळा बुधवारी (दि.१७)रोजी या ठिकाणी साजरा झाला. श्रीरामनवमीच्या निमित्ताने सकाळी मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन तसेच मुलांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ,भगव्या पताका हाती घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन मंदिर परिसरात शोभा यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर हभप.रोहिदास महाराज गर्जे(राजे धर्माजी गड संस्थान हातोला)यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन झाले.मयावेळी मोठ्या संख्येने महिला,पुरुष,तरुण,तरुणींची उपस्थिती होती. ह.भ.प.गर्जे महाराजानी राम जन्मोत्सव व रामलीला यावर सुंदर असे विवेचन करत कीर्तन केले. त्यानंतर बारा वाजता फुले टाकत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी आरती झाल्यानंतर महाप्रसादाची पंगत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments