Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हाचिंचपूर पांगुळ येथे जलजीवन योजनेच्या विशेष ग्रामसभेत शौचालय लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या...

चिंचपूर पांगुळ येथे जलजीवन योजनेच्या विशेष ग्रामसभेत शौचालय लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या तोंडी तक्रारी!

अखेर ग्रामस्थांची मान्यता, पण जुन्या पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्न चिन्हच…
सोमराज बडे
Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी
: जनजीवन मिशन योजनेंतर्गत नळाचे पाणी प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला देण्याचा केंद्र व राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.या योजनेंतर्गत पाणी योजनेचे कामे सुरू आहेत. या कामांमध्ये त्रुटी राहू नयेत, ग्रामस्थांच्या शंका निरसन व्हावे.तसेच ग्रामस्थांची राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल मते जाणून घेण्यासाठी राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे मंगळवारी (दि.११) सरपंच प्रगतीताई बडे पा. यांच्या अध्यक्षतेखाली व पाथर्डी पंचायत समितीचे
उपअभियंता ए. जे.सानप आणि ग्रामसेवक अशोक साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी चिंचपूर पांगुळ येथे जलजीवन योजनेच्या विशेष ग्रामसभेत शौचालय लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्याच्या तोंडी तक्रारी केल्या. तर अखेर राबविण्यात येणाऱ्या जलजीवन योजनेला ग्रामस्थांची मान्यता, पण जुन्या पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्न चिन्ह…

या दरम्यान ग्रामसभेत प्रारंभी युवानेते तथा माजी सरपंच धनंजय बडे पा. यांनी ग्रामस्थांना गावांसाठी योजना का आवश्यक आहे. ती का फायदेशीर आहे, याबाबतीत स्पष्ट करुन श्री बडे यांनी जलजीवन योजनेबद्दल ग्रामस्थांनी आपआपली मते मांडवित, असे म्हटले. यावर प्रगतशील शेतकरी तथा जागृत नागरिक पोपटराव हरीभाऊ बडे पा‌. यांनी जलजीवन योजनेला आमचा विरोध नाही. परंतु यापूर्वी गावात झालेल्या पाणीपुरवठा योजनेची पूर्णपणे अद्याप कोणतीही अंमलबजावणी का झाली नाही? असा सवाल उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर केला. यानंतर एका ग्रामस्थाने योजना गावाच्या फायद्याची असल्याने त्यास ग्रामस्थांनी सहमती द्यावी. या दरम्यानच काही ग्रामस्थांनी हागणदारीमुक्त योजनेसाठी आलेला निधी लाभार्थ्यांना मिळत नसल्याच्याही तक्रारी केल्या. यामुळे एकप्रकारे ग्रामसभाही वादळी चर्चाची झाली.

गावातील नागरिक पोपट बडे ,रघुनाथ बडे यांनी विविध कामाच्या बाबतीत चौकशी करण्यात यावी यासाठी तक्रारी दाखल केलेल्या आहेत .
त्यामुळे मंगळवारी झालेल्या जलजीवन मिशन योजनाबाबत विशेष अशी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मानांकन प्राप्त गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम, तसेच इतर शासकीय योजनांच्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये चर्चा घडवून आणून ग्रामसभेचे ठराव घेण्यासाठी दि.१३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावात पाणी योजनेची कामे सुरू आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडील २४सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार जलजीवनच्या कामांबाबत विशेष ग्रामसभा घेऊन चर्चा घडवून आणणे, प्रत्यक्षात होणार्‍या कामांमध्ये काही त्रुटी राहू नयेत, ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन व्हावे व ग्रामस्थांची मते जाणून घेऊन ग्रामस्थांमध्ये योजनेविषयी स्वामित्वाची भावना निर्माण करणे, शंभर टक्के नळजोडणी झालेली गावे हर घर जल घोषित करण्याबाबत ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे मंगळवारी ( दि.११) पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपअभियंता ए. जे.सानप हे ग्रामसभेस यावेळी उपस्थित होते.
चिंचपूर पांगुळ गावात पूर्वीची पाणीपुरवठा योजना झालेली असताना दुसरी पाईपलाइन टाकण्याची गरज नाही, असा अर्ज रघुनाथ बडे,पोपट बडे आदी नागरिकांनी जिल्हा परिषद अहमदनगर येथे दाखल केला होता.
पाणी पुरवठा पाईपलाईन गेली सहा महिने पासून बंद असून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे जलजीवन चे काम सुरू करण्याआधी पूर्वीची तुटलेली पाणी पुरवठा पाईपलाइन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा. असा ठराव सर्व ग्रामस्थांच्या उपस्तिती घेण्यात आला असून येत्या काही दिवसात पाणी पुरवठा केला जाईल.असे मा.सरपंच धनंजय बडे यांनी सांगितले.मात्र विरोधकांनी फक्त विरोधास विरोध न करता गावच्या विकासास प्राधान्य द्यावे असे आवाहन मा.सरपंच धनंजय बडे यांनी यावेळी केले. तर पोपट हरिभाऊ बडे यांनी सांगितले की, आमचा विकास कामास विरोध नसून बोगस होत असलेल्या कामास विरोध आहे.अपूर्ण कामे पूर्ण करावीत नंतर नवीन कामास सुरवात करा.
ज्येष्ठ सदस्य विष्णू खाडे, पुरुषोत्तम रधवे,आजीनाथ बडे,अशोक बारगजे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments