Monday, May 20, 2024
Homeक्राईम४७७ बेलेबल, नॉनबेलेबल व पोटगी वॉरंट बजावणी ; अ.नगर जिल्हा पोलीसांची कामगिरी

४७७ बेलेबल, नॉनबेलेबल व पोटगी वॉरंट बजावणी ; अ.नगर जिल्हा पोलीसांची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
विशेष मोहिमे दरम्यान ४७७ बेलेबल, नॉनबेलेबल व पोटगी वॉरंट बजावणी करण्यात आल्याची कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

एसपी राकेश ओला यांनी बेलेबल, नॉन बेलेबल व पोटगी वॉरंट बजावणीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दि. १० जुलै २०२३ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करुन पोलीस ठाणे अभिलेखावरील जास्तीत जास्त बेलेबल, नॉन बेलेबल व पोटगी वॉरंटची बजावणी करणे बाबतचे सूचना दिल्या होत्या. सुचनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन बेलेबल २८४, नॉनबेलेबल १९० व पोटगी वॉरंट ३ असे एकूण ४७७ वॉरंटची बजावणी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments