Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हानिस्वार्थ काम केल्यामुळेच संतोष बोरा यांची बिनविरोध निवड : श्रीनिवास बोज्जा

निस्वार्थ काम केल्यामुळेच संतोष बोरा यांची बिनविरोध निवड : श्रीनिवास बोज्जा

अ.नगर इंडस्ट्रिअल इस्टेट संचालकपदी संतोष बोरा ; फटाका असोसिएशनतर्फे सत्कार
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने फटाका असो. चे सचिव संतोष बोरा यांची अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल असो. चे ज्येष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे व सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी बोलतांना असो.चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने प्रत्येक सभासदांचे हित पाहून कार्य करीत असते. संतोष बोरा यांची बिनविरोध निवड ही असोसिएशन साठी अभिमानाची गोष्ट आहे. निस्वार्थ पणे काम केल्यामुळेच त्यांची निवड झालेली आहे.चांगले काम केल्यास त्याकामाचे फळ हे नेहमीच चांगले मिळते म्हणून कोणतेही काम करीत असतांना फळाची अपेक्षा ठेवू नका चांगले काम करत रहा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना संतोष बोरा म्हणाले माझा हा सत्कार नक्कीच मला या पुढे काम जोमाने करण्यासाठी ऊर्जा ठरेल. हा सत्कार असो चे वतीने झाला परंतु मी हा सत्कार माझ्या परिवारातील लोकांनी केला असे मानतो. त्यांनी सर्व सभासदांचे व असो. चे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन सोमनाथ रोकडे यांनी केले. स्वागत सुरेश जाधव यांनी केले. आभार शिरीष निखिल परभणे यांनी मानले.
यावेळी सुनील गांधी, अशोक कर्डीले, गणेश परभने, साहेबराव गारकर, संजय सुराणा, संतोष वल्ली, शिवराम भगत, राजू छल्लानी, उमेश क्षीरसागर, संतोष तोडकर, अनिल टकले, अमोल तोडकर, संजय जंजाळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments