Thursday, May 9, 2024
Homeविशेष बातम्याअपघात होताच प्रतापकाका धावले अन् आम्ही वाचलो! ; जखमी थोरात कुटुंबाची प्रतिक्रिया

अपघात होताच प्रतापकाका धावले अन् आम्ही वाचलो! ; जखमी थोरात कुटुंबाची प्रतिक्रिया

Nagar Reporter सोमराज बडे
Online news Natwork
पाथर्डी-
एका चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका वृद्ध महिलेसह जखमी झालेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांनी केल्याने या घटनेत जखमी झालेल्या थोरात कुटुंबीयांनी प्रतापकाका ढाकणे यांच्या मदतीमुळेच आम्हाला तातडीने उपचार मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया प्रत्येकास देत होते.


याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रतापकाका ढाकणे हे बुधवारी (३१) रात्री १० वाजण्याच्या सुमारास अकोले या गावाहून पाथर्डीकडे येत असताना तनपूरवाडी शिवारात अकोलेकडे जाणाऱ्या एका रिक्षाला एका चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात तीन पलट्या खाऊन रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली, तर ज्या वाहनाने या रिक्षाला धडक दिली ते वाहन भरधाव वेगात निघून सुद्धा गेले. यावेळी प्रतापकाका ढाकणे हे तेथून जात असताना त्यांनी तातडीने गाडीतून उतरत या रिक्षात असलेल्या अकोले येथील केसरबाई थोरात, यश थोरात सुधाकर थोरात व रिक्षाचालक माऊली खंडागळे यांना बाहेर काढले. यावेळी प्रतापकाका ढाकणे यांच्या मदतीला त्यांचे कार्यकर्ते बंटी गर्जे, विनू गिरी, गोविंद गर्जे, सलीम शेख, मतीन शेख हे सुद्धा धावून आले. थोरात कुटुंब या घटनेत जखमी झालेले व वृद्ध असलेल्या केसरबाई थोरात या आजारी असल्याने त्यांना घेऊन पाथर्डी येथील रुग्णालयात गेले होते. मात्र येताना अचानक झालेल्या या अपघातामुळे थोरात कुटुंब चांगलेच धास्तावले होते. परंतु प्रतापकाका ढाकणे यांनी सर्वांना धीर देत तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावली तसेच पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. या अपघातात केसरबाई थोरात यांच्या हाताला मोठी जखम झाली होती. रुग्णवाहिका येताच सर्व जखमींना प्रतापकाका ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. ज्या गाडीने रिक्षाला धडक दिली ती रिक्षापुढे काही अंतरावर बेवारसरित्या रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याचे पोलिसांना आढळले. या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना रात्रीच्या वेळेस तातडीने उपचार मिळाल्याने केसरबाई थोरात यांनी प्रतापकाका ढाकणे वेळीच मदतीला आल्याने या अपघातातून आम्ही बचावलो असल्याची प्रतिक्रिया प्रत्येकाला देत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments