Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्र१ तासात शोधून बेपत्ता लहान मुले सापडवली ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

१ तासात शोधून बेपत्ता लहान मुले सापडवली ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: बेपत्ता झालेल्या दोघा मुलांना शोधून सापडण्याचे महत्वाचे काम नगर एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. विराज विवेक तरवडे (वय ४) , प्रतीक अमोल देशमुख (वय ५, दोघे रा. वड़गाव गुप्ता )अशी मुलांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि‌.२ मार्च २०२४ रोजी नगर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील वड़गाव गुप्ता शिवारतील विराज विवेक तरवडे, प्रतीक अमोल देशमुख (दोघे रा. वड़गाव गुप्ता) ही दोघे बेपत्ता असल्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती. या घटनेची गंभीरपणे दखल घेत तात्काळ नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.उपनि मनोज मोंढे व तपास पथक यांचे मार्फत शोध घेऊन यातील दोन्ही मुलांचा 1 तासाच्या आत शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांचे ताब्यात दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments