Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हासामाजिक योजनांचा सर्व एचआयव्ही संसर्गितांस लाभ द्या : जि.प सीओ राजेंद्र...

सामाजिक योजनांचा सर्व एचआयव्ही संसर्गितांस लाभ द्या : जि.प सीओ राजेंद्र क्षीरसागर

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  –
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती,  एचआयव्ही, टीबी समन्वय समिती ईएमटीसीटी समिती, नवभारत@ 75 जनजागृती अभियान समित्यांची बैठक काल मा.जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी,  जिल्हा क्षयरोग अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक , तसेच इतर सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक समिती अंतर्गत कामाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच covid कालावधीत जिल्हा रुग्णालयात गर्दी  होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर लिंक एआरटी केंद्र स्थापन करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव पाठविण्या बाबत सूचना दिल्या.
त्याच प्रमाणे  सर्व एचआयव्ही संसर्गित यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत विहान तसेच इतर प्रकल्पांच्या प्रकल्प व्यवस्थापक यांना यावेळी सूचना देण्यात आल्या.
नोंदणी प्रमाणे सर्व गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी केली जावी
सर्व टी बी  संशयित रुग्णांची तपासणी करण्यात यावी.अश्या  सूचना देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments