Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमशुभम गारुडकर यांना उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन देण्यास नकार

शुभम गारुडकर यांना उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन देण्यास नकार

Nagar Reporter
Online news Natwork
संभाजीनगर :
शुभम सिताराम गारुडकर यांना उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी नाथा मुरलीधर देशमुख यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना रस्ता अडवण्याच्या कारणावरून गारुडकर व त्यांच्या कुटुंबियांनी देशमुख व त्यांच्या साथीदारांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये बाळासाहेब शंकर शेळके, आदेश शेळके तसेच निलेश नाथा देशमुख, योगेश यशवंत देशमुख यांना सिताराम नारायण गारुडकर, शुभम सिताराम गारुडकर व विनायक सिताराम गरुडकर यांनी तलवार व लोखंडी गजाने जबरी मारहाण करण्यात आली होती.
याप्रकरणी शुभम गारुडकर यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन दाखल केला होता. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. नरेंद्र बापूसाहेब पाटेकर यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने इन्वेस्टीगेशन पेपर्स व मेडिकल पेपर्स पाहून गारुडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास नाकार दिला, म्हणून अटकपूर्व अर्ज गारुडकर यांनी विड्रॉ, माघारी काढून घेण्यात आला. वास्तविक पाहता ज्या रस्त्याच्या कारणावरून वाद झाला आहे. त्याचे दिवाणी प्रकरण न्याप्रविष्ट आहे. तहसीलदार यांनी विवाहित रस्ता हा गारुडकर यांना खुला करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाचा निर्णय असून देखील मनगटशाहीने गारुडकर यांनी सदर रस्ता माती टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून फिर्यादी व इतर ग्रामस्थ हे त्यांना रस्ता बंद न करण्यासाठी सांगायला गेले असता उलट पक्षी त्यांनी फिर्यादी व इतर सदस्यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली. आरोपी शुभम गारुडकर हा सैन्य दलात नोकरी करत असल्यामुळे त्याने दडपशाही व मनगटशाही करून फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली होती. पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत. त्यांनी निपक्षपणे तपास करावा. आरोपीला अटक करावी, म्हणून फिर्यादी यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे रेसर पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती फिर्यादीतर्फे देण्यात आली. या प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲड नरेंद्र बापूसाहेब पाटेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments