Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाहिंदसेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

हिंदसेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पत्रकार चौकातील जागेबाबत कायदेशीर लढ्याला सुरुवात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: हिंदसेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर’च्या केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थेला वकिला मार्फत नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषेदेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे, अनिल गट्टाणी, मंदार मुळे यांनी दिली.
वसंत लोढा म्हणाले, पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात हिंदसेवा मंडळाची स्थापना १९२२ सोसायटी रजिस्टेशन ॲक्ट १८६०-रजि नं. १७७० व बॉम्बे पब्लिक ॲक्ट १९५० नं.एफे ९ या नोंदणी कृत संस्थेच्या ताब्यातील नगर भूमापन नं. ४३ अ याचे क्षेत्र ३ एकर २९ गुंठे नगर मनमाड रोड लगत ची बहुमुलय मिळकत संगनमताने, कटकारस्थान रचून, विश्वासघात करण्याच्या दृष्ट हेतूने व संस्थेच्या सभासदांना व जनतेला फसवण्यासाठी म्होरक्या विश्वस्त अजित सिमरतमल बोरा, अनंत रामचंद्र फडणीस, शिरीष दामोदर मोडक, संजय दादा जोशी व इतर विश्वस्त यांनी सदर जागेचा ४० वर्षाचा करार शिल्लक असताना व सरकारी किंमत ३२ कोटी रुपये व बाजार भाव ४०० कोटी रुपये असताना जाणिवपुर्वक फकत २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव घेऊन अनाधिकाराने विश्वस्त कायदा व वक्फ कायदा व भारतीय दंड संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द कलम ४०६, ४०९, ४६८, ४७०, ४७१, १२०ब व ३४ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
श्री चव्हाण म्हणाले ही जागा देवस्थान इनामी जमीन असल्याने विक्री होऊ शकत नाही, तसेच सध्या असलेल्या मंडळाच्या बॉडीला धर्मादाय आयुक्तांनी चेंज रिपोर्ट मंजूर केला नाही. त्यामुळे त्यांना व्यवहार करता येत नाही. पहिले या जागेबाबत पोलीसामध्ये फिर्याद दिली. नंतर ६ महिन्यात पदाधिकारी जागांचे ताबा सोडायला तयार यामध्ये तरी पाणी मुरत आहे. आम्ही सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग मागितले तरी ते अजून लिहले गेले नाही, आम्ही आता हा जागा वाचवण्याचा लढा सुरु केला आहे. या जागेचे कच्चे व्यवहार सुरु झाले असून २५००० रु गुंठा ही जागा इतरांना विक्री होत आहे असे समजते.
वसंत लोढा म्हणाले आम्ही ही जागा जाऊ देणार नाही वक्फ बोर्डाकडे या जागेची नोंद आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या आहेत. या विरोधात आवाज उठवल्यानंतर शहरातील अनेक मंदिरे, मज्जीद , चर्चच्या जागांची तसेच शहरातील तांबेमारीची प्रकरणे आली आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments