Wednesday, May 1, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकचिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत मलिक-मलकेश्वर यात्रोत्सवाची सांगता..!

चिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत मलिक-मलकेश्वर यात्रोत्सवाची सांगता..!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :-
अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ(पाथर्डी) येथील ग्रामदैवत मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता शनिवार (दि.१३) रोजी कुस्त्याचा हंगामाच्या कार्यक्रमाने संपन्न झाली.यात्रा महोत्सवसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीक्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात आला.शुक्रवारी (ता.१२)रात्री छबिना मिरवणूक तसेच कोल्हापूर येथील प्रसिद्ध कशीस हिंदी मराठी गाणी तसेच नृत्याचा कार्यक्रम झाला. शनिवारी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात आला होता.या कुस्त्यासाठी नामवंत मल्लानी हजेरी लावली होती. दरवर्षी प्रमाणे भव्य दिव्य असे कुस्त्यांचे सामने खेळवले गेले राजभरातून खेळाडूं उपस्तित झाले होते.बीड,उस्मानाबाद,पुणे,बारामती,सोलापूर,जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हगाम्यांत हजेरी लावली.कुस्ती समालोचन निवेदक दिनेश गवळी यांनी केले. यावेळी महिला पहिलवान देखील सहभागी झाले होते.

 यात्रा कमिटीच्या वतीने विजयी मल्लांना भरघोस अश्या रोख इनामाने गौरविण्यात आले.ऍड.कल्याण बडे पाटील,पाथर्डी पचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड,बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाट,हभप आंधळे महाराज, आबा आवारे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.तसेच मोठ्या संख्येने मल्लानी उपस्तिती लावली होती. गावातील तसेच परिसरातील मुबंई, पुणे तसेच इतर ठिकाणी असलेले चाकरमानी आवर्जून यात्रेसाठी उपस्थित होते.चिचपुर पांगुळ येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते. यावर्षी तरुणांनी ठरवले तर काहीही अशक्य नाही .याचाच प्रत्यय गावातील तरुणांनी यात्रेचे उत्तम प्रकारे नियोजन करत यात्रा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात,शांततेत पार केल्याचे पहावयास मिळाले.यावेळी कुस्ती शौकीन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रविवारी सालशीद बाबा यांना नारळ मलिदा अर्पण करून यात्रोस्तव सपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments