Thursday, May 9, 2024
Homeक्राईमचिंचपूर पांगुळ येथून दुभत्या म्हशी चोरी ; चोरीचे गुन्हे दाखल होऊनही अनेक...

चिंचपूर पांगुळ येथून दुभत्या म्हशी चोरी ; चोरीचे गुन्हे दाखल होऊनही अनेक गुन्हे उघडकीस का नाही? एसपी साहेब पाथर्डी पोलिसांच्या पोलिसिंगवर लक्ष द्याचं!

Nagar Reporter सोमराज बडे
Online news Natwork

पाथर्डी :
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील म्हशींच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.११ मार्च २०२४) ला मध्यरात्री १ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या एक पंढरपुरी तर दोन मेहसाना जातीच्या म्हशी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेक चोरीचे गुन्हे दाखल होऊन त्या गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हे उघडकीस आले नाहीत, ही बाब पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विशेषतः पाथर्डी पोलिस ठाण्यावर लक्ष केंद्रित करून पोलिसींग न करता कामात हलगर्जीपणा करणा-या संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दुध व्यवसायासाठी मंगळवारी (दि.५ एप्रिल २०२३) ला पाथर्डी बाजारातून माझ्या नावे एक म्हैस व पत्नी सिंधुबाईच्या नावे दोन म्हशी खरेदी केल्या होत्या. सोमवारी (दि‌.११ मार्च २०२४) ला रात्री ८ वाजता राहात्या घरी चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी) येथे मुलगा दत्तात्रय पोपट बडे याने तिन्ही म्हशींचे दुध काढून त्यांना चारा टाकून घरातील सर्वजण झोपले होते. तर मी भजनासाठी गावात गेलो होतो. त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परत आलो, तेव्हा गोठ्याकडे अंधार असल्याने ते गोठ्याकडे गेले नाहीत, मुलगा दत्तात्रय हा सकाळी ६ वाजता दूध काढण्यासाठी गेला असता, गोठ्यात म्हशी दिसल्या नाही. यानंतर परिसरात म्हशींचा शोध घेतला असता, त्या मिळून न आल्याने म्हशी चोरी गेल्याची खात्री झाली‌. यानंतर पोपट दशरथ बडे (रा.चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात दुभत्या तीन म्हशी चोरी गेल्याच्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


यापूर्वीही या परिसरात अनेक वेळा छोट्या-मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना,घरफोड्या,शेळ्या चोरी, पाणी उपसा करणाऱ्या मोटारी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पण या चो-यांचा तपास पाथर्डी पोलिसांकडून अद्यापही लागला नाही. पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होतात, पण पाथर्डी पोलिसांकडून तपास का लागत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे पाथर्डी पोलिसांच्या पोलिसिंगवरच आता तालुक्यातील नागरिकामधून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाथर्डी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येऊन सुद्धा तपास होऊन विशेषतः चोरीचे गुन्हे उघडकीस येत नसल्याने पाथर्डी पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments