Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हापत्रकार रामराजे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ‌ : अप्पर पोलीस अधीक्षकांना...

पत्रकार रामराजे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ‌ : अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

पत्रकार रामराजे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ‌ : अप्पर पोलीस अधीक्षक यांना लोकराज्य बहुजन पत्रकार संघाच्या वतीने निवेदन
Nagar Reporter
Online news Natwork अहमदनगर :
पत्रकार रामराजे शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ‌देत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन लोकराज्य बहुजन पत्रकार संघाच्या वतीने अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

यावेळी संघाचे अध्यक्ष रामराजे शिंदे, पत्रकार राम चव्हाण, महेश चव्हाण, सोमनाथ शिंदे,‌गणेश शिंदे , विशाल शिंदेसह पत्रकार उपस्थित होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३१ मार्च रोजी मढी (ता.पाथर्डी) येथे वैदू समाजाची मेळावा होणार असल्या कारणाने दि.११ मार्चला वैदूवाडी शेजारी प्रियदर्शनी कॉलनी दत्त मंदिर येथे वैदू समाजाची नियोजन बैठक चालू असतांना सिंकदर बाबाजी शिंदे यांनी लोकराज्य बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व अहमदनगर परिवर्तन साप्ताहिकचे संपादक रामराजे शिंदे यांना लाकडाच्या दांडक्यानी पाठीमागून येऊन डाव्या खांदयावर जबर हल्ला केला व असे म्हणाला की,परत कुठे दिसला तर तुझ्या भावाचा खून केला तसच तुझा पण खून करीन, अशी धमकी दिली आहे.या घटनेबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात पत्रकार रामराजे शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments