Saturday, April 27, 2024
Homeक्राईमचारित्र्याच्या संशयाने बायकोसह मुलांना जाळले ; नगर तालुक्यातील 'पिंपळगाव लांडगा'ची घटना

चारित्र्याच्या संशयाने बायकोसह मुलांना जाळले ; नगर तालुक्यातील ‘पिंपळगाव लांडगा’ची घटना

चारित्र्याच्या संशयाने बायकोसह मुलांना जाळले ; नगर तालुक्यातील ‘पिंपळगाव लांडगा’ची घटना
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर :
चारित्र्याच्या संशय घेऊन बायकोसह मुलांना कोंडून झाळून टाकण्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे सोमवारी (दि.२५मार्च) सकाळी घडली. या भयानक घटनेने नगर तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोमवारी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


याबाबत समजलेली माहिती अशी की, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी सुनील लांडगे (वय ४५) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. लिलाबाई सुनील लांडगे (वय ३५), साक्षी (वय १३) व खुशी(वय १४) हे या घटनेमध्ये मयत झाले आहेत. नगर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे पुढे आले आहे. आरोपी सुनील लांडगे याला आपल्या बायकोचे एका पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. यामुळे दोघात अनेक वेळा भांडणे झाल्याचे तपासामध्ये पुढे आलेले आहे .
सोमवारी (दि.२५ मार्चला) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमाराला आरोपी सुनील लांडगे याने आपल्या पत्नीसह मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून घरामध्ये त्यांना पेटवून दिले. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि गीते हे या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलचा वास येत होता. घरामध्ये त्यांना डांबून जाळून टाकण्याचा प्रकार घडल्यामुळे त्यांचे हात पाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजलेले होत, त्यांना रुग्णालयात नेल्यावर डाॅक्टरानी मयत घोषित करण्यात आले. दुपारी उशिराने शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले असून प्राथमिक स्तरावर त्यांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments