Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाशिर्डी येथील गुन्हेगारी टोळीस २ वर्षाकरीता केले हद्दपार

शिर्डी येथील गुन्हेगारी टोळीस २ वर्षाकरीता केले हद्दपार

Nagar Reporter
Online news Natwork
शिर्डी
: घातक हत्याराने दरोडा, जबरी चोरी करणारी शिर्डी येथील गुन्हेगारी टोळीस दोन वर्षाकरीता केले हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीतील गुन्हेगारी टोळीला चांगलाच दणका दिला आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील टोळी प्रमुख राजु उर्फ शाक्या अशोक माळी (रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) व टोळी सदस्य किरण ज्ञानदेव सदाफुले (रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. जि. अहमदनगर) यांनी एक टोळी तयार करुन त्यांच्या टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी शिर्डी पोलीस ठाणे, राहाता, हरित व आसपासचे परिसरात घातक हत्यारासह दारोडा टाकणे, चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, चोरी करणे असे ५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन परिसरातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये टोळीची कायमस्वरुपी दहशत राहण्यासाठी सराईतपणे गुन्हे केलेले होते. टोळीची दिवसेंदिवस गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्य याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून व प्रतिबंधक कारवाई करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. टोळीच्या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्ह्यांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस ठाण्यात येत नव्हते. टोळीकडून भविष्यात
गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्द तसेच मालाविरुध्दचे गुन्हे घडणार असल्याने संपूर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नाही. शिर्डी पोलीस ठाणे व राहाता तालुका परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे सुरक्षिततेसाठी तसेच टोळीची नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी टोळीचे टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई होऊन अहमदनगर जिल्हा हद्दीतून तसेच नाशिक जिल्यातील येवला तालुका तसेच औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर तालुक्यातून दोन वर्षाकरीता हडपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस ठाणे यांनी या प्राधिकरणाकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी करुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी टोळी प्रमुख राजु उर्फ शाक्या अशोक माळी (रा. गणेशवाडी शिडी, ता. राहाता, जि. अहमदनगर) व टोळी सदस्य किरण ज्ञानदेव सदाफुले ( रा. श्रीरामनगर शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) यांना २ वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments