Monday, May 20, 2024
Homeक्राईमअ.नगरला ८ लाखांची सुगंधीत तंबाखू पकडली ; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

अ.नगरला ८ लाखांची सुगंधीत तंबाखू पकडली ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

एकूण १६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर:
गुजरात राज्यातून पुणे या ठिकाणी विक्रीसाठी जाणारी सुगंधीत तंबाखू अहमदनगर शहरामध्ये जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. या कारवाईत एलसीबी टिम’ने तब्बल एकूण १६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबी पोलीस अंमलदार संतोष लोढे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड आदिंच्या टिमने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने अहमदनगर ते मनमाड जाणारे रोडवर सावेडी नाका या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता त्यांना बातमीतील वाहन येतांना दिसले, वाहन चालकास थांबवून टेम्पोमधील मालाची खात्री करता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ सुगंधीत तंबाखू मिळून आली. टेम्पो चालकास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अशोक बाबासाहेब जावळे (वय ३३, रा. जवळाला, ता. पाटोदा, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. मिळून आलेल्या तंबाखुबाबत टेम्पो चालकास अधिक विचारपुस करता त्याने सुगंधीत तंबाखु ही सुरेंद्र प्रसाद (रा. सेक्टर ६३, नोएडा, दिल्ली), वसिम शेख (रा. अहमदाबाद, गुजरात) चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात यांनी टेम्पोमध्ये भरुन देऊन ती विक्रीकरीता पुणे या ठिकाणी पाठविले असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या टेम्पोमध्ये ८ लाख ३० हजार रुपये किमतीची ८३० किलो सुगंधीत तंबाखू तसेच ८ लाख रुपये किमतीचा टेम्पो (क्र. एमएच. १४ के. क्यु. ९१७४) असा एकूण १६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला अशोक बाबासाहेब जावळे, फरार सुरेंद्र प्रसाद (रा. सेक्टर ६३, नोएडा, दिल्ली), वसिम शेख (रा. अहमदाबाद, गुजरात, चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात या याच्याविरुध्द एलसीबीचे पोकाॅ रोहित मिसाळ यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८९/२०२४ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

२१ गंभीर गुन्हे दाखल असणारा पकडून, दोन घरफोडी उघड ; एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी

अहमदनगर : २१ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पकडून, त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात अहमदनगर एलसीबी’ला यश आले आहे. तुषार हवाजी भोसले (वय २३, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड ) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे अंमलदार सपोनि हेमंत थोरात अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, मच्छिद्र बर्ड, अमोल कोतकर, सागर ससाणे, भाऊसाहेब काळे, फुरकान शेख, विजय टोंबरे, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, २६ जानेवारी २०२४ ला बंद घराचे कुलूप अनोळखी इसमांनी तोडून आत प्रवेश करुन कपाटातील १ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याबाबत अजय विठ्ठल कोकाटे ( रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५३/२४ भादविक ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने पाथर्डी बसस्थानक येथे सापळा लावून थांबलेले असताना ९.४५ वाजण्याच्या सुमारास माहितीप्रमाणे एक संशयीत बसस्थानकामध्ये येताना दिसला. पोलिसांची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले, पोलीसांची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार हवाजी भोसले (वय २३, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगितले. संशयीताची पंचा समक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत सोन्याची मोहनमाळ व पोत मिळून आली. सोन्याचे दागिन्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार राम चव्हाण (रा. आष्टी, जि‌ बीड, फरार) अशांनी मिळून चिंचोडी पाटील (ता. नगर) व राहुरी येथून बंद घराचा दरवाजा तोडून चोरी केलेले सोन्याचे दागिने असुन विक्री करता आणल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपीने सांगितलेल्या अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. ५३/२४ भादविक ४५४, ३८० व राहुरी पो.स्टे.गु.र.नं. १२८/२४ भादविक ४५४, ३८० प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी तुषार हबाजी भोसले यास १ लाख २० हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची मोहनमाळ व १ लाख २० हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकुण २ लाख ४० हजार रुपये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments