Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्रीक्षेत्र मोहटादेवी येथील शारदीय नवरात्रोत्सवाची होमहवन पूजा करून सांगता..!

श्रीक्षेत्र मोहटादेवी येथील शारदीय नवरात्रोत्सवाची होमहवन पूजा करून सांगता..!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे, पाथर्डी : श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानात अष्टमी होमहवनाने शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता होउन यात्रा उत्सवाची सांगता येत्या शनिवारी कोजागिरी पौर्णिमेस महापूजेने होणार आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारलागड्डा यांच्या हस्ते होम हवन महापूजा संपन्न झाली. यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट प्रकर्षाने जाणवले. शारदीय नवरात्र उत्सव निमित्त ची मोहट्याची यात्रा दोन टप्प्यात संपन्न होते.

पहिला टप्पा घटस्थापने पासून अष्टमी होमापर्यंतचा असून त्याची सांगता (ता.२३) काल रात्री झाली. यामध्ये राज्याच्या विविध भागातून भाविक देवस्थानला भेट देतात. आमदार निलेश लंके यांनी व अन्य नेत्यांनी भाविकांसाठी आपआपल्या मतदारसंघातून विशेष आराम गाड्यांची सोय केली होती.

यावर्षी पायी चालत येणाऱ्या भाविकांची वर्दळ सहाव्या माळे नंतर वाढली. दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ महानवमी (ता. 23 )पासून सुरू होऊन त्या दिवशी देवीला पैठण येथून आणलेल्या कावडीच्या पाण्याने स्नान घालून नूतन वस्त्रअलंकार परिधान केले जातात. विजयादशमीला शस्त्र पूजनानंतर सिमोल्लंघन सोहळा होतो.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असून द्वादशीच्या दिवशी कलाकारांच्या हजेरी, दुपारी कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रा पूर्ण होते. कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी पारंपरिक पद्धतीने पूजा होऊन सर्व कर्मचारी, अधिकारी मिळून महाआरती करतात. नवरात्रोत्सवानिमित्त च्या उपवास व हरिनाम सप्ताहाची सांगता आज झाली. यंदाच्या यात्रोत्सवावर दुष्काळाची तीव्र छाया व शेती कामाला मजुरांची वाढती टंचाई यामुळे भाविकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत घटली होती.

अष्टमीनिमित्त रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुमारीका पूजन,जलाभिषेक नंतर होमाच्या पूर्णहुतीने कार्यक्रम संपन्न झाला. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारलागड्डा व मालती यारलागड्डा, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी, ऍड. कल्याण बडेपाटील यांच्यासह सर्व विश्वस्त यांचे हस्ते होम हवन विधी पूर्ण झाले. धार्मिक विधीचे पौरोहित्य मुख्य पुरोहित भूषण साखरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे ,संदीप घुले, आदीसह सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत नवरात्रोत्सवात विशेष कार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments