Monday, May 20, 2024
Homeराजकीयमी लोकांचे पैसे घेतले नाही, मला माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत-पंकजा मुंडे

मी लोकांचे पैसे घेतले नाही, मला माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत-पंकजा मुंडे

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,प्रतिनिधी :भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विजयादशमी (Vijayadashami) च्या शुभमुहूर्तावर बीड (Beed) मधील सावरगाव (Sawargaon ghat) येथे आयोजित दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2023) उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि ‘भगवान बाबा की जय’ अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

दरम्यान यावेळी कार्यकर्त्याकडून पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबी मधून पुस्पवृष्टी करण्यात आली.तर “भगवानभक्तीगड ट्रस्ट”, सावरगाव घाट व ग्रामस्थ यांच्याकडून शिव आणि शक्ती यांचे प्रतीक म्हणून त्रिशूळ भेट देत मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ऊसतोड कामगार संघटना यांच्यावतीने उसाची मोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

दरम्यान आपल्या भाषणातून सरकारवर शेतकरी,मजूर,ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नावरून कडाडून टीका केली.मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण ,धनगर समाजाला आरक्षण या कळीच्या मुद्यांवर नेते ,सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

ऊसतोड कामगाराच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ऊसतोड कामगारांनी कामावर जाऊ नये असे म्हणत एकप्रकारे ऊसतोड कामगारांना संपाची हाक दिली आहे. पुढे बोलतांना म्हणाल्या की,माझ्या विषयी अनेक अफवा पसरवून देतात कि,मी त्या पक्षात जाणार,या पक्षात जाणार,पण माझी निष्ठा एवढी “लेची-पेची नाही,असे म्हणत आपण भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याचे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी अधोरेखीत केले.

देवीला” लाखो असुरांसोबत युद्ध करावे लागते. असे म्हणत आपल्याला पक्षांतर्गत विरोध असल्याचे त्यांनी सूचित केले.मी हरले तरी तुम्ही माझ्या गळ्यात हार घालता.; हे कुणाच्याही नशिबात नसते.हा समोर असलेला समुदाय शिवशंकर आहे; शिवशंकर भोळा आहे.परंतु शंकराला तिसरा डोळा सुद्धा आहे,आता माझी माणसे शांत बसणार नाहीत.असा इशारा विरोधकांना आपल्या भाषणांतून दिला.

यावेळी आमदार मोनिका राजळेंना उद्देशून मी परळी आणि पाथर्डीला कधीच वेगळे समजले नाही. पाथर्डीला मी माझाच मतदार संघ समजते असे मिस्कीलपणे म्हटले. त्याच बरोबर श्रीकृष्णाला सुद्धा मथुरा सोडावी लागली होती,आणि द्वारका वसवावी लागली होती.आपल्याला सुद्धा परिस्तिती बदलावी लागणार असल्याचे सूतोवाच केले.

माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात ११ कोटी तुम्ही जमा केले. तुम्ही उन्हात बसलात, म्हणून स्टेजवरचे सुद्धा उन्हात आणि मी सुद्ध उन्हात आहे.आपल्याला त्रास देणाराचे घर उन्हात बांधू असा घणाघात आपल्या भाषणात केला.मी लोकांचे पैसे घेतले नाही, मला माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत. तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही, असे मी माझ्या मुलाला सांगितलं. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही.

 राजकारणात माझ्या लोकांचे हित बघणे माझे परम कर्तव्य आहे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही. माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरले असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम मी करणार नाही. माझा अपमान तो तुमचा अपमान आहे,तुमचे दुःख ते माझं दुःख आहे.एक काळ असा येईल की, पिढी व्यसनाधीन करण्यात येईल. त्यामुळे सावध राहा. 

आपल्या भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी सांगितले की, येणाऱ्या पिढीच्या ताटात गोड जेवण येण्यासाठी मी माझे आयुष्य खर्ची घालणार असून मी थकणार नाही,रुकणार नाही,कोणापुढे झुकणार नाही,”घेतला वसा टाकणार नाही” असे म्हंटले. यावेळी खा.डॉ.प्रीतम मुंडे,खा. डॉ.सुजय विखे,आम.मोनिका राजळे,आ.शिवाजी कर्डीले,आ.सुरेश धस,ऊसतोड संघटनेचे नेते, राज्यासह देशभरातून आलेला बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते व हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments