Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकअ. नगर जिल्ह्यातील शाळांना ई-लर्निंग संचांचे वाटप..!

अ. नगर जिल्ह्यातील शाळांना ई-लर्निंग संचांचे वाटप..!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी :अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळांना सकाळ माध्यम समूहा’द्वारे शाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऍक्ट फॉर एज्युकेशन’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या रोश इन्फॉर्मेशन सोल्यूशन्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सहकार्याने पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागातील श्री वामनभाऊ माध्यमिक विद्यालय, चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी,जि.अ.नगर ,तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दगडवाडी,ता.पाथर्डी,जि. अहमदनगर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गिऱ्हेवाडी,ता.संगमनेर,जि. अ. नगर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जामगाव, ता. अकोले, जि. नगर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोरवाडी, ता. नगर, जि. अ. नगर या चार प्राथमिक शाळांना आज वार शुक्रवार (ता.२०) रोजी ई-लर्निंग संचांचे वाटप करण्यात आले.

यामुळे सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेण्यास मदत मिळणार आहे.

दुर्गम ,ग्रामीण तसेच प्रामुख्याने ऊसतोड कामगार असणाऱ्या या भागातील शालेय विद्यार्थ्यांनी सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये डिजिटल ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे तसेच गरजेचे असून; हीच गरज ओळखून ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘रोश’ या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयात ई-लर्निंग संचांचे वाटप केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करोडी ग्रामपंचायतचे सरपंच डॉ.राजेंद्र मुरलीधर खेडकर हे होते.

या प्रसंगी कंपनीचे सीएसआर समन्वयक व प्रशासन सहायक श्रीपाद महाजन, सौरभ सोंगणी, स्वप्नील येलकर, कृष्णपाल सिंग चौहान,जयदीप जोशी, तसेच सकाळ समूहाचे नगर आवृत्तीचे वरिष्ठ व्यवस्थापक देविदास आंधळे , मुरलीधर कराळे मुख्य बातमीदार सकाळ अहमदनगर,राहुल गरड व्यवस्थापक सकाळ इंडिया फौंडेशन,पत्रकार उमेश मोरगावकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नरोडे,केंद्रप्रमुख निलेश वराडे, विस्ताराधिकारी दरंदले,दादासाहेब बारगजे,उद्धव केदार,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश बडे,आणि वरील सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,व श्री वामनभाऊ विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी ,विदयार्थी,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय नरोडे यांनी केले.सूत्रसंचालन सनी मर्दाने तर आभार प्रदर्शन बाळासाहेब घुले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments