Friday, May 17, 2024
Homeक्राईमवाळुंज दरोड्यातील एकास पकडून लाखाचा ऐवज जप्त, २ गुन्ह्यांची उकल : नगर...

वाळुंज दरोड्यातील एकास पकडून लाखाचा ऐवज जप्त, २ गुन्ह्यांची उकल : नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

वाळुंज दरोड्यातील एकास पकडून लाखाचा ऐवज जप्त, २ गुन्ह्यांची उकल : नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यानगर
: नगर तालुक्यातील वाळुंज दरोड्यातील एकास पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास केल्यावर अजून 2 गुन्हे उघडकीस आणण्यात नगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. प्रशांत घुमीर चव्हाण (वय २३, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असं पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी घराचा दरवाजा कोणीतरी अनोळखी ७ ते ८ आरोपींनी तोडून आत प्रवेश करुन घरातील लहान मुलांना धरुन चाकूचा धाक दाखवला व घरातील ७ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत जनार्दन संभाजी हिंगे रा. वाळुंज, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८५१/२३ भादविक ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याची एसपी ओला यांनी तातडीने दखल घेऊन एलसीबी पोनि श्री.आहेर यांना घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि श्री. आहेर यांनी तपासासाठी एलसीबीच्या दोन टिम तयार केल्या. एलसीबी टिम’ने गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेतली. एलसीबी टिम’ला दि.३० एप्रिल २०२४ रोजी नगर तालुका परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना वाळुंज शिवार (ता. नगर) येथील चोरी ही आरोपी प्रशांत चव्हाण (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) याने त्याच्या इतर साथीदारांसह केली असून तो चिचोंडी पाटील गावामधील स्टँडवर बसलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाली‌. एलसीबी टिम’ने तात्काळ माहितीनुसार चिचोंडी पाटील गावातील एसटी स्टँड येथे जाऊन शोध घेतला असता एक संशयीत एसटी स्टँड परिसरात बसलेला दिसला. एलसीबी टिम’ची खात्री होताच त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत घुमीर चव्हाण (वय 23, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार फरार लिमलेश देशपांड्या चव्हाण, ऋषीकेश दिगु भोसले, आयलाश्या जंगल्या भोसले ( रा. आष्टी, जि. बीड व गणेश दिवाणजी काळे (तिघे रा. वाकोडी, ता. नगर) व लिमलेश चव्हाण याचे ३ अनोळखी साथीदारांनी मिळून केल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपी प्रशांत घुमीर चव्हाण याच्याकडे इतर काही गुन्हे केले काय ? याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने इतर साथीदार फरार लिमलेश देशपांड्या चव्हाण, ऋषीकेश दिगु भोसले ( दोघे रा. हिवरा पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड), आयलाश्या जंगल्याभोसले ( रा. आष्टी, जि. बीड) अशांनी मिळून नोव्हेंबर २०२३ ला मांडवे (ता. नगर) येथील एका घराचे किचनचा दरवाजा तोडून चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८५१/२३ भादविक ३९५ व गु.र.नं. ८५७/२३ भादविक ४५७,३८० प्रमाणे २ गंभीर गुन्हे दाखल असून, २ गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत विचारपुस करता आरोपींने त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात पुरुन ठेवल्याचे सांगितले. एलसीबी टिम’ने तात्काळ आरोपीचे चिंचोडी पाटील येथील घराच्या पाठीमागे शेतात पुरुन ठेवलेले ३५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, ३५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत,२१ हजार रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाची कानातले व १४ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेतला. आरोपीस मुद्देमालासह नगर तालुका पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments