Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
शिर्डी
: भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी दुपारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. तत्पूर्वी शिर्डी विमानतळावर त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी यांचे स्वागत केले. त्यानंतर साई समाधी मंदिरात जाऊन त्यांनी साईंची पाद्य पूजा केली. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे होते.
राष्ट्रपती यांनी श्री द्वारकामाई, श्री गुरुस्थान मंदिरातही दर्शन घेतले.
साई संस्थांनच्या वतीने महामहिम राष्‍ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, यावेळी महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस, पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

त्यांचा श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार करण्यात आला. साईबाबांनी हाताळलेल्या संस्थांनच्या वस्तू संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर साईप्रसादालयात प्रसाद भोजन घेतले. शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या त्या भारताच्या सहाव्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेसाठी शिर्डीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रपती यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांची, साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments