Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्यामहिला सरपंचासह लिपिक लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

महिला सरपंचासह लिपिक लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

Nagar Reporter
Online Natwork
अहमदनगर –
रस्ता मजबुतीकरण कामाचे बिल जिल्हा परिषदेकडून मंजूर होऊन निंबळक (ता.नगर) ग्रामपंचायत बॅंक खात्यामध्ये जमा झाले, परंतु ते बिल मिळावे, यासाठीच्या चेकवर सहीसाठीची लाच स्वीकारताना लिपिक‌ दत्ता धावडे याने तक्रारदारकडून पंचासमक्ष लाच स्विकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच घेण्यासाठी सरपंच प्रियांका लामखडे‌ यांनी सांगितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाल्याने महिला सरपंच व लिपिक दोघांवर अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्र एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या सूचनेनुसार अहमदनगरचे पोनि शरद गोरडे, पोह संतोष शिंदे, विजय गंगुल, पो.अं. वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, मपोना संध्या म्हस्के,राधा खेमनर, चालक हारून शेख, तागड आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,तक्रारदार हे ठेकेदार यांनी निंबळक गावातील निंबळक – लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याच्या कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर कडून मिळाला होता. त्यांनी त्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करुन केलेल्या कामाचे बील १३ लाख ६५ हजार ५६ रु.मंजुरीसाठी जिल्हा परिषदेमध्ये सादर केले होते. बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाले होते. तक्रारदार यांना १२ लाख ३८ हजार ५५६ रुपयांचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीचा मिळाला होता. त्यावेळी सुद्धा आरोपी लोकसेवक सरपंच प्रियांका अजय लामखडे‌ ( वय ३५, सरपंच, निंबळक, ता- नगर, जि. अहमदनगर) यांनी तक्रारदार यांच्याकडून पैसे घेतल्यानंतरच चेकवर सही केली होती. तक्रारदार यांच्या बिलातील १ लाख २६ हजार रुपये रक्कम जीएसटीपोटी ग्रामपंचायतने राखून ठेवली होती. तक्रारदार यांनी जीएसटी पूर्तता करुन१ लाख २६ हजार रुपये रकमेचा चेक ग्रामपंचायत निंबळकच्या ग्रामसेविका यांच्याकडे मागणी केली असता, ग्रामसेविका यांनी चेकवर सही करुन चेक तयार ठेवला होता. परंतु चेकवर सही करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक सरपंच प्रियांका अजय लामखडे‌ यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिली. तक्रारीचे अनुषंगाने मंगळवारी (दि.१०) निंबळक येथे लाच पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक सरपंच प्रियांका अजय लामखडे‌ व‌‌ निंबळक ग्रामपंचायत लिपिक दत्ता वसंत धावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम आरोपी लोकसेवक निंबळक सरपंच प्रियांका अजय लामखडे‌ यांनी आरोपी लोकसेवक निंबळक ग्रामपंचायत लिपिक दत्ता वसंत धावडे याच्याकडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाल्यानंतरच तक्रारदार यांच्या बिलाचे चेकवर सही करेन असे आरोपी लोकसेवक सरपंच प्रियांका अजय लामखडे‌ यांनी सांगितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. त्यावरून मंगळवारी (दि.१०) निंबळक ग्रामपंचायतसमोर लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक लिपिक दत्ता वसंत धावडे याने तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष २० हजार रुपयांची लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments