Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाभरोसा सेल, न्यू आर्ट्स, रेसिडेन्शिअल कॉलेज व हायस्कूलतर्फे वृक्षारोपण

भरोसा सेल, न्यू आर्ट्स, रेसिडेन्शिअल कॉलेज व हायस्कूलतर्फे वृक्षारोपण

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर भरोसा सेल, न्यू आर्ट्स कॉलेज आणि  रेसिडेन्शिअल जुनियर कॉलेज व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज क्रीडांगण, जिमखाना परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच उत्साहाने पार पडला.

   जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह)  श्री डांगे यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य श्री डॉ. झावरेसर, प्राचार्य श्री दोडकेसर, श्री साबळेसर, श्री मगरसर, श्रीमती मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धन पर्यावरण रक्षण यांचे महत्त्व समजावे तसेच पोलीस व विद्यार्थी यांच्यामधील दरी कमी होऊन त्यांच्यामध्ये सुसंवाद घडला जावा. सामाजिक बांधिलकी जपली जावी, अशा अनेक उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केलेल्या वृक्षांचे योग्य संवर्धन व्हावे, या करिता सपोनि श्रीमती उबरहंडे -देशमुख यांनी एनसीसी व एनएसएसचे दोन दोन विद्यार्थ्यांमध्ये एक एक वृक्ष दत्तक म्हणून दिले.
यशस्वीतेसाठी भरोसा सेल प्रभारी अधिकारी सपोनि श्रीमती पल्लवी उबरहंडे-देशमुख,  भरोसा सेलचे सर्व पोलीस कर्मचा-यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments