Monday, May 20, 2024
Homeक्राईमन्यायालयात घुसून वकिलाचा खून

न्यायालयात घुसून वकिलाचा खून

न्यायालयात घुसून वकिलाचा खून

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
उत्तरप्रदेश – 
  उत्तरप्रदेश येथील शाहजहांपुर या ठिकाणी भरदिवसा न्यायालयामध्ये घुसून वकिलाचा खून केल्याची घटना घडली. गोळी मारल्यानंतर आरोपी हा फरार झाला. घटनेची माहिती मिळाताच  घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल. भूपेंद्र प्रताप सिंह असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे.
वकील सिंह यांचा न्यायालय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर गोळी मारून खून करण्यात आला. वकिल भूपेंद्र सिंह हे कामानिमित्त न्यायालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड रुममध्ये गेले असता, या दरम्यान त्यांना गोळ्या घातल्या. या घटनेनंतर गोळी मारणारा आरोपी हा पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळाताच घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून, तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही पाहिले आहे. परंतु अद्याप वकील सिंह यांचा खून कोणत्या कारणाने झाला,याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments