Monday, May 20, 2024
Homeक्राईमवाहतूक पोलीसाला 800 मीटर फरफटत नेले..

वाहतूक पोलीसाला 800 मीटर फरफटत नेले..

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे –
वाहतूक पोलिसाने 400 रुपयांचे चलन फोडल्याचा राग आल्याने त्या वाहनचालकाने वाहतूक पोलीस  कॉन्स्टेबला बोनटवर लटकवून 800 मीटर फरफटत नेल्याची घटना पुणे येथे मुंडवा पोलिस ठाणे हद्दीत घडली.

एका कार चालकाने वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलला कारच्या बोनेटवर लटकवून सुमारे 800 मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ऑन ड्यूटी कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात घालणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील मुंडवा भागातील आहे. मुंडवा पोलिस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल शेषराव जयभाव आपल्या काही सहकाऱ्यांसह दुपारी ड्युटीवर होते. दरम्यान, हडपसर येथील रहिवासी प्रशांत श्रीधर कांतावार (43) हे त्यांच्या कारने वेगाने जाताना दिसले. त्यांना पाहून पोलिस कॉन्स्टेबल शेषरावने त्याला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. श्रीधरने गाडी थांबवली, पण हवालदार पाहून तो म्हणाला, ‘एकही कॉन्स्टेबल कामाचा नाही, प्रत्येकजण इथे पैसे गोळा करण्यासाठी उभे आहेत.’ पोलिस कॉन्स्टेबल शेषराव यांनी त्याला पेपर मागितले. न दाखवल्याबद्दल 400 रुपयांचा दंड आकारुन  चलन  फोडले. परंतु वाहतूक पोलीसाकडून दंडाचे चलन घेण्यापूर्वीच कार चालकाने आपली कारपुढे ढकलली. त्याला हे करताना पाहून वाहतूक पोलीस हा कारसमोर उभा राहिला. यानंतरही कार चालक थांबला नाही नसून, कारचालक याने पोलिस  कॉन्स्टेबलवर कार चढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस काॅन्स्टेबल त्याचा जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बोनेटवर उडी मारली. या परिस्थितीत चालकाने पोलिस कॉन्स्टेबलला सुमारे 800 मीटरपर्यंत फरफटत नेले. नंतर हवालदार कारवरुन खाली पडला आणि कारचालक कारसह पळून गेला.
फरार झाल्यानंतर पोलिसांनी कारचालक श्रीधरचा  शोध घेतला आणि अखेर सोमवारी संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments