Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशहेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीसी जनरल बिपीन रावत यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू

हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीसी जनरल बिपीन रावत यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
चेन्नई-
सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे एमआय -17 हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले. कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी 12:20 च्या सुमारास कोसळताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जण होते. त्या सर्वांचाच मृत्यू झाला आहे.

जनरल बिपीन रावत यामध्ये गंभीर प्रकारे भाजल्या गेले. त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चीफ ऑफ आर्मी स्टाफ (CDS) रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशची माहिती मिळताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रावत कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर संरक्षण मंत्री गुरुवारी हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटनेवर संसदेत माहिती देणार आहेत.
जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश होता. त्यांना घटनास्थळावरून नेतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या थोड्या वेळानंतरच रावत यांच्या निधनाचे वृत्त समोर आले.
वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते.
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.
जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.
हेलिकॉप्टरमधील 9 लोकांची यादीबिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लें. क. हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक. जितेंद्र कुमार, ले. नायक विवेक कुमार, ले. नायक बी. साई तेजा, हवलदार सतपाल
Mi-17 चा एका महिन्यात दुसरा अपघात
लष्करी हेलिकॉप्टर Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात Mi-17 हेलिकॉप्टर कोसळले. यात प्रवास करणाऱ्या सर्व 12 जणांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments