Monday, May 20, 2024
Homeक्राईमसाकत येथे बेकायदा बायोडिझेलचा साठा जप्त पुरवठा विभागाची कारवाई : चौघांवर...

साकत येथे बेकायदा बायोडिझेलचा साठा जप्त पुरवठा विभागाची कारवाई : चौघांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर :
नगर तालुक्यातील साकत येथे अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असताना पुरवठा विभागाने छापा टाकला. या ठिकाणी नऊ हजार लिटर बायोडिझेल, एक टॅंकर (एमएच 12 डीजे 6320) व एक ट्रक (एनटी 34 व्ही 7049) असा 16 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकत (ता. नगर) शिवारात अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, पुरवठा निरीक्षक राजेंद्र राऊत, वैशाली शिकारे, अभिजित वांढेकर, महादेव कुंभार यांच्या पथकाने साकत शिवारात पंजाब नॅशनल ढाब्याशेजारी छापा टाकला. त्यावेळी बायोडिझेलची विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने टॅंकर, ट्रकसह बायोडिझेल असा साठा जप्त केला. चौघांना अटक करण्यात आली आहे. पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आरोपी शरद मोहन ठुबे (रा. केडगाव, नगर), विकास बाळासाहेब रोमन (रा. लोहसर खाडगाव ता. पाथर्डी), दत्ता सुखदेव भालके (रा. लोंढेमळा, केडगाव), बालसुब्रमण्यम आरूमुगन (रा. तमिळनाडू) यांचा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments