Sunday, May 19, 2024
Homeअहमदनगर जिल्हासराईत चोरटे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

सराईत चोरटे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
रात्रीचे वेळी घराचे दरवाजे तोडून हत्याराने मारहाण करुन दरोडे घालणारे दोन सराईत चोरटे पोलिसांनी पकडले. या चोरट्यांकडून ८७ हजार ५०० रु. किं. चे चार चोरीचे मोटार सायकली जप्त करण्यात आले असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण (वय २५, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा), महावीर घड्याळ्या चव्हाण, (वय २१, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके  यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, सफौ.नानेकर, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, संदीप पवार, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ सागर ससाणे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, जालिंदर माने, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, मेघराज कोल्हे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,  दि १८ ऑक्टोबर  २०२१ रोजीचे रात्री कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी  घराचा लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा कटावनीचे सहाय्याने तोडून व लाकडी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोकांना लोखंडी कटावनी व गजाने मारहाण करुन कपाटामधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण ७८ हजार रु. कि. चा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता, या सरिता सुनिल निवडूंगे ( रा. सुपा शिवार, ता. पारनेर ) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात  गुरनं. ३२६ / २०२१ भादवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोनि अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि श्री कटके यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली.  गुन्हा हा जावेद चव्हाण व महावीर चव्हाण ( दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा ) यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.   माहितीनुसार आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवून सापळा लावून आरोपी  जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण, महावीर घड्याळ्या चव्हाण या दोघांना सुरेगाव शिवारातील डोंगरामधून पाठलाग करुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे  गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे आणखी कोठे कोठे गुन्हे केलेले आहेत. याबाबत कसून चौकशी केली असता आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण याने गुंडेगाव ( ता. नगर), राळेगण थेरपाळ (ता. पारनेर), यवत (ता. दौंड) या ठिकाणाहून यापूर्वी चार मोटारसायकल चोरी केल्या असल्याची माहिती दिली. मोटार सायकल चोरीबाबत संबधित पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत खात्री केली असता आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकलबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून मोटार सायकल चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
दोन्ही ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्या विरुध्द यापूर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, स्वस्तात सोने देण्याची अमिष दाखवून दरोडा घालणे, चोरी, मारामारी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण हा तीन गुन्ह्यामध्ये फरार आहे. आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण याचे विरुध्द दाखल असलेले गुन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments