Monday, May 20, 2024
HomeUncategorizedराशीन खून प्रकरण : आरोपी कर्जत पोलिसांकडून 8 तासात अटक

राशीन खून प्रकरण : आरोपी कर्जत पोलिसांकडून 8 तासात अटक

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत-
बायकोचा खून करून फरार झालेल्या आरोपीस आठ तासात पकडण्याची कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे. राहुल सुरेश भोसले (रा.अजिंठानगर पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत  उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पो. नि  चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोउपनि भगवान शिरसाठ, पोकाॅ तुळशीदास सातपुते, पांडुरंग भांडवलकर, संभाजी वाबळे, गणेश ठोंबरे, शाम जाधव, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, भाऊ काळे, सुनील खैरे आदिंच्या पथकासह गावक-यांच्या मदतीने आरोपी भोसले याला पकडण्यात आले.
याबाबत समजलेले माहिती अशी की, आरोपी भोसले हा खून करून जागेवरून पळून गेला होता. पो नि चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ घटनास्थळ भेट देऊन आरोपी शोध मोहीम आपले सहकाऱ्यांचे मदतीने सुरू केली होती. दरम्यान आरोपी माळवाडी परिसरातून काठड्यातून पलीकडे जाऊन दौडच्या दिशेने गेल्याबाबत माहिती मिळत होती. 3 पथके करून करमाळा, दौंड आणि पुणे येथे रवाना करण्यात आली होती. ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल दिले होते. स्थानिक नागरिकांना मदतीला घेतले होते. तरीही आरोपी गुंगारा देत होता. शेवटी संध्याकाळी 6 वाजता कर्जत पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. आरोपी हा रात्री पळून जाण्याच्या इराद्याने खूप मोठ्या काठड्यात लपून बसला होता.
त्यास ताब्यात घेतले.  आरोपी भोसले याने गुन्हा कबूल केला आहे. वारंवार सांगून विनंती करूनसुद्धा पत्नी अपमानजनक वागणूक देत होती, नांदायला येत नव्हती. मुलांना संपर्क करू देत नव्हती. तिच्या नातेवाईकांनी ही त्रास दिला होता, त्यांनी आरोपीला आणि आरोपीच्या आईला मारहाण केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments