Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याशिर्डीत चुकलेली महिला सुखरुप तिच्या तेलंगणा घरी ; सपोनि राजेंद्र सानप यांची...

शिर्डीत चुकलेली महिला सुखरुप तिच्या तेलंगणा घरी ; सपोनि राजेंद्र सानप यांची कौतुकास्पद कामगिरी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- 
एक महिला शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी परिवाराबरोबर आली होती. या दरम्यान परिवाराची आणि त्यांची हुका-चूक झाली. त्या नगर-पुणे महामार्गाने तेलंगणा राज्यातील आपले गाव शोधत होत्या. परंतु त्यांना त्यांचे गाव सापडत नव्हते. या निराधार महिलेला चार महिन्यानंतर तेलंगणाला घरी सुखरूप पोहोचविण्याची कौतुकास्पद कामगिरी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी केली.

समजलेले माहिती अशी की, संबंधित महिला चार महिन्यापूर्वी शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या परिवारासोबत आल्या होत्या. या महिलेच्या घरच्यांनी  सगळीकडे शोधाशोध केली, तेलंगणा पोलिसांनी कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र मध्ये शोधमोहीम राबविली पण त्यांना त्या मिळून आल्या नाही. कर्तव्यदक्ष नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने अखेर या महिलेला  आपल्या घरी जाता आले . तेलंगणा राज्यातील परप्रांतीय एका महिलेची नाव ब्यागरी बक्म्मा रामचंद्रह (वय ६०) तिचे.तेलंगणा राज्यातील विक्राबाद जिल्ह्यातील कोतलापूर या गावतील त्या राहणाऱ्या.चार महिन्यांपूर्वी त्या शिर्डी येथे नातेवाईकांसोबत  देवदर्शनासाठी आल्या होत्या. तेथेच कुटुंबांची आणि त्यांची हुका-चूक  झाली. त्या नगर पुणे महामार्गावरून पायी चालत चालत  कामरगाव येथे आल्या. सामाजिक कार्यकर्ते सरपंच तुकाराम कातोरे यांनी या महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस करून. चंद्रकला दारकुंडे यांच्याकडे तीन ते चार दिवस त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांनतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे संबंधित ठिकाणी तात्काळ दाखल  झाले यांनी त्या महिलेची आस्थेने चौकशी  करून सर्व माहिती गोळा केली व पुढील तपास चालू केला तपासामध्ये महिला तेलंगणा जिल्ह्यातील राज्यातील विक्रा बाद जिल्ह्यातील कोतलापूर या गावातील असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तेलंगणाचे पोलीस निरीक्षक जि.व्ही.श्रीणु यांच्याशी संपर्क करून संबंधित महिला महाराष्ट्रातील अहमदनगर  पोलिसांच्या ताब्यात सुखरूप आहेत, अशी माहिती त्यांनी तेथील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अरणगाव येथील मानवसेवा केंद्रात या महिलेला दाखल केले.   तेथील संचालक दिलीप गुंजाळ यांनी या महिलेला घरचे नातेवाईक येऊ पर्यंत आपल्या मानव सेवा केंद्रात आश्रय दिला.
कर्तव्यदक्ष नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व आई वडिलांच्या ममतेने सांभाळ करणारे प्रकल्प संचालक यांच्या सामुहिक प्रयत्नातून आपल्या घरापासून  दुरावलेल्या या महिलेला  सुखरूप पोचल्याने सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार केला.
  पोलीस विभागामध्ये काम करत असताना कायदा व सुव्यस्था साभाळून असहाय व निराधार महिलेला आधार देण्याचेही काम करता आले व तुकाराम कातोरे यांनी केलेल्या सहकार्यामुळे कर्तव्य पार पडत असताना या महिलेला त्यांच्या घरी सुखरूप  पोहोचविता आले मोठे समाधान वाटते असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments