Monday, May 20, 2024
Homeक्राईमबायकोशी भांडणं करून नव-याने स्वतःच्या घराला लावली आग ; बाजूची घरेही...

बायकोशी भांडणं करून नव-याने स्वतःच्या घराला लावली आग ; बाजूची घरेही जळल्याने मोठे नुकसान

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सातारा – 
येथे  बायकोबरोबर भांडणं झाल्यानंतर संतप्त झालेल्या नव-याने आपल्याच स्वतःच्या घराला आग लावली. या आगीमध्ये आजूबाजूची १० घरे जळल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना पाटण तालुक्यातील माझगाव या ठिकाणी मंगळवारी (दि.१९) घडली. या घटनेनंतर बायकोने नव-याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली.

याबाबत समजलेले माहिती अशी की, साताऱ्यातील पाटण येथे एका व्यक्तीने आपल्या बायकोशी भांडण झाल्यावर त्याने त्याचे घर पेटवले. ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने काही वेळातच शेजारच्या १० घरांनी देखील आगीत जळून खाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सर्व घरे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपी नव-यावर गुन्हा दाखल केला आहे.  माझगाव येथील रहिवासी संजय पाटील यांचे सोमवारी दुपारी पत्नी पल्लवीसोबत भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की दोघां नवरा-बायकोमध्ये मारहाण झाली. यानंतर संजय हा संतक झाला की त्याने बाहेरून पेट्रोल आणले आणि त्याच्या घरावर शिंपडले आणि आग लावली.
शेजाऱ्यांनी आरोपींला पकडून बेदम मारहाण केली. पेट्रोलमुळे, ज्वाला इतक्या भीषण होत्या की आरोपीच्या शेजारील 10 घरांना वेढा घातला. या आगीत संजयच्या जवळच्या परिसरातील चार घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमुळे आगीने भीषण रूप धारण केले. घटनेनंतर आरोपीला पकडले गेले आणि शेजाऱ्यांनी जबर मारहाण केली आणि नंतर त्याला ओढून पोलिस ठाण्यात नेले.
बायकोने देखील मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत मालमत्तेचे खूप नुकसान झाले आहे, परंतु योग्य वेळी घरातून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आरोपी नवरा अटक करण्यात आले आहे.  बायकोने देखील नव-याविरुद्ध मारहाणीची तक्रारही दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments