Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याराज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती
लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

Nagar Reporter
Online news Natwork
पुणे :
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी
https://www.maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या srpfgr5@rediffmail.com ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments