Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याराज्य उत्पादन शुल्क नगर : मागील वर्षांच्या तुलनेत सरत्या वर्षात 899.47...

राज्य उत्पादन शुल्क नगर : मागील वर्षांच्या तुलनेत सरत्या वर्षात 899.47 कोटी रु. महसूल प्राप्त!

👉962 इतक्या कमी केसेस करून 830 आरोपींवर कारवाई
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
कोरोनाच्या वाढत्या काळात अहमदनगर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन्ही भरारी पथकांनी बेकायदेशीर व बनावट दारु प्रकरणाच्या  सन 2020-21 यामागील वर्षाच्या तुलनेत सन 2021-22 ऑक्टोबरपर्यंत 962 इतक्या कमी केसेस करून 830 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तर मागील दोन वर्षाच्या तुलनेत  899.47 कोटी रुपयांचा कमी महसूल हा अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगर  राज्य उत्पादन शुल्क विभागात एकूण पाच निरीक्षक असून, याचा समावेश असणा-या दोन्हीही भरारी पथकांनी यापूर्वी  2019-20 या वर्षाच्या तुलनेत 2020-21 या वर्षात 1 हजार  667 केसेस कल्या, म्हणजे 70 जास्त केसेस केल्या होत्या. या कारवाईमध्ये भरारी पथकांनी एकूण 1 हजार 214 आरोपींना अटक करण्यात आली होती. 2021-22 यावर्षी ऑक्टोबर 2021 पर्यंत मागील दोन्ही वर्षाच्या तुलनेत कमी 962 केसेस करून 830 आरोपींना अटक केली आहे.
समजलेली माहिती अशी की, सन 2019-20 मध्ये एकूण केस 1 हजार 597, वारस गुन्हे 1 हजार 339, बेवारस गुन्हे 258, अटक आरोपी 1 हजार 310, जप्त वाहने 206, एकूण जप्त मुद्देमाल 5.45 कोटी रूपये. सन 2020-21 मध्ये एकूण केसेस 1 हजार 667, वारस गुन्हे 1 हजार 341, बेवारस गुन्हे  326, अटक आरोपी 1 हजार 214, जप्त वाहने 176, एकूण जप्त मुद्देमाल 3.07 कोटी रूपये. तर मागील दोन्ही वर्षाच्या तुलनेत सन 2021-22 या कोरोनाच्या काळात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण केसेस 962 केल्या. यात वारस गुन्हे 886, बेवारस गुन्हे 76, अटक आरोपी 830, जप्त वाहने 70, एकूण जप्त मुद्देमाल 3.37 कोटी रूपये जप्त केला आहे.
सन 2019-20 यावर्षी 1458.74 कोटी रूपये, सन 2020-21 यावर्षी 1479.01 कोटी रूपये आणि आता सन 2021-22 (ऑक्टोबर 2021पर्यंत) 899.47 कोटी रुपयांचा महसूल अहमदनगर शुल्क विभागास मिळाला असल्याची माहिती आहे.

📥अहमदनगर उत्पादन शुल्क विभागाला एक अधिक्षक  व एकूण 5 निरीक्षक आहेत. या निरीक्षकांसह 3 ते 4 अन्य कर्मचा-यांचा समावेश असणारी अहमदनगर जिल्ह्यात दोन भरारी पथके आहेत.
🍷🍺अहमदनगर जिल्ह्यात परवाने
देशी दारूचे – 155 परवाने
वाईनशाॅपीचे – 43
परमिटरूमचे – 656
बिरशाॅपीचे – 102

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments