Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकमोहटा देवस्थान मध्ये शारदीय नवरात्रौत्सवास सुरवात.!

मोहटा देवस्थान मध्ये शारदीय नवरात्रौत्सवास सुरवात.!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी : मोहटा देवस्थान मध्ये शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त पारंपारिक पद्धतीने वेद मंत्रोच्चाराच्या घोषात (ता.१५)रोजी घटस्थापना करण्यात आली . देवस्थान समितीचे अध्यइक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व सौ नीता गोसावी यांचे हस्ते घटस्थापना झाली. “आई राजा उदो उदो”,”मोहटा देवी की जय”, आशा घोषणा, विविध वाद्यांच्या गजराने गडाचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सर्वत्र भाविकांची मांदियाळी पसरली. सकाळी मोहटे गावापासून देवीचे सुवर्ण अलंकार सोन्याच्या मुखवट्याची वाजत गाजत देवी गडापर्यंत मिरवणूक निघाली. रेणुका विद्यालयाचे लेझीम पथक, दांडिया पथकासह विविध पथके मिरवणुकीत सहभागी झाले. अत्यंत राजवैभवात मुखवटा मिरवून गाभाऱ्यात येताच उपस्थित हजारो भाविकांनी जय जय कार करत संबळ वाद्यांच्या गजरात देवीचे स्वागत केले. भाविकांनी उस्फूर्तपणे हात जोडून पुष्पवृष्टी केली. वेदशास्त्र संपन्न भूषण साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर या ब्रह्म वृंदांनी वेदमंत्राचारात पूजा विधी करून घटस्थापना केली.

त्यानंतर आरती करण्यात येऊन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी पाथर्डीच्या न्यायाधीश अश्विनी बिराजदार, विश्वस्त ऍड. कल्याणराव बडे पाटील, डॉ श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, ऍड. विक्रम वाडेकर, अनुराधा केदार, श्रीराम परत आदि विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीशांनी यात्रा कालावधीत गाभारा दर्शन बंद केल्याने भाविकांना विना अडथळा थेटपणे देवीचे दर्शन ोणार आहे. घटस्थापनेच्या दिवशीच भाविकांचा व ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्रभर देवी गडाकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले हज्योत पेटवून घेणारे मंडळे, पायी चालणारे भाविकांचे गट यामुळे रात्रभर पाथर्डी शहरातही नवरात्रमय वातावरण झाले. यंदा विश्वस्त मंडळाने दर्शन रांगेची सोय अधिक सुलभ केल्याने गर्दीचे प्रमाण अधिक असले तरी नारळ गेटपासून पायऱ्या चढून भाविक अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेऊन बाहेर पडणार आहेत.दरवर्षी विविध भाविकांकडून गाभार्‍यामध्ये दररोज फुलांची आकर्षक सजावट सेवा कार्य म्हणून केली जाते. आजची सजावट पिंपरी चिंचवडचे नगरसेवक संगीता भोंडवे व उद्योजक राजेंद्र भोंडवे यांचे कडून सेवा म्हणून सजावट कार्य केले गेले. निवास, भोजन, आरोग्य व पिण्याचे पाणी आदी सुविधा देवस्थान समितीतर्फे देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पोलीस, होमगार्ड ,पोलीस मित्र असा मोठा फौज फाटा तैनात असून सर्वत्र सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे कार्यरत आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक जादा गाड्या पाथर्डीच्या दोन्ही बस स्थानकावरून सोडण्यात येत असून देवस्थान समितीची सुद्धा एक गाडी भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments